Dev Diwali 2022 : हिंदू पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठनी एकादशी म्हणतात. देवउठनी एकादशी 4 नोव्हेंबरला आहे. आषाढ शुक्ल एकादशीला भगवान विष्णू (Lord Vishnu) चार महिने योगनिद्रेत जातात व कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात. या चार महिन्यांत देवाच्या निद्रेमुळे सर्व शुभ कार्य वर्ज्य असतात आणि जेव्हा भगवान विष्णू जागे होतात, त्यानंतरच कोणतेही शुभ कार्य पूर्ण होऊ शकते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामचा विवाह आयोजित केला जातो. त्यानंतर शुभ कार्याला सुरूवात होते. या वर्षी देव दीपावली 8 नोव्हेंबरला साजरी न होता 7 नोव्हेंबर रोजी साजरी होईल, असे ज्योतिषांचे मत आहे. जाणून घ्या
देव दिवाळीचे महत्व
पौराणिक कथेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला. त्रिपुरासुराच्या वधानंतर सर्व देवदेवतांनी एकत्रितपणे आनंद व्यक्त केला. असे मानले जाते की या दिवशी सर्व देवी-देवता भगवान शिवासोबत पृथ्वीवर येतात आणि दिवा लावून आनंद साजरा करतात.देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. देव दिवाळीच्या दिवशी देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि दिवाळी साजरी करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. प्राचीन काशी शहरात, लोक या देवतांचे स्वागत करण्यासाठी लाखो दिवे पेटवून हा उत्सव साजरा करतात. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.
देव दिवाळी 2022 : तारीख आणि शुभ वेळ
पंचांगानुसार देव दिवाळी कार्तिक पौर्णिमा 08 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. परंतु 2022 वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणार असून ग्रहण काळात पूजा करणे शुभ मानले जात नाही. या वर्षी देव दीपावली 07 ऑक्टोबर रोजी साजरी होईल, असे ज्योतिषांचे मत आहे. देव दीपावली यावर्षी सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या वर्षी कार्तिक महिन्याची पौर्णिमा दुपारी 4.15 वाजता सुरू होऊन 8 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 4.31 पर्यंत आहे. देव दिवाळीच्या दिवशी विशेष दीपदान आणि देवतांची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:14 ते 7:49 पर्यंत असेल
देव दीपावली 2022 : पूजेसाठी शुभ मुहूर्त
देव दिवाळी: 7 नोव्हेंबर 2022, सोमवार
कार्तिक पौर्णिमा तिथी सुरू होईल : 7 नोव्हेंबर 2022 दुपारी 4:15 वाजता
कार्तिक पौर्णिमा तारीख संपेल : 8 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 4:31 पर्यंत
प्रदोष काल देव दीपावली मुहूर्त : 7 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 05:14 ते संध्याकाळी 07:49 पर्यंत
देव दिवाळी पूजा कालावधी : 02 तास 35 मिनिटे
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:43 ते दुपारी 12:26 पर्यंत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहण होईल, राहू-केतूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करा 'हे' उपाय