Pune CNG Update : पुण्यातील (Pune) ग्रामीण भागात असणारे सीएनजीचे पंप (CNG Petrol Pump) अनिश्चित काळापर्यंत बंद राहणार आहेत. एमओपीएनजी परिपत्रकानुसार, व्यापार मार्जिन सुधारित मिळेपर्यंत आजपासून अनिश्चित काळासाठी पुणे ग्रामीण भागांतील टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजीची विक्री न करण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे. 


पुण्यात 1 नोव्हेंबरपासून सीएनजी गॅस मिळणार नाही. सर्व सीएनजी पंप बंद राहतील. पुण्यातील सीएनजी पंप चालकांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पुणेकरांच्या सामान्य दिनचर्येवर परिणाम होणं स्वाभाविक आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 1 नोव्हेंबरपासून सीएनजी पंप अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहेत. पेट्रोल डीलर्स असोसिएशननं हा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे कर्मचारी 1 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जात आहेत. 


जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा पेट्रोल डीलर्स असोसिएशननं दिला आहे. ड्यू पेमेंट आणि व्याजाची रक्कम डीलर्सच्या खात्यात पोहोचेपर्यंत सीएनजी पंप उघडणार नाहीत, असंही पेट्रोल डीलर्स असोसिएशननं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजपासून पुणेकरांना सीएनजी गॅस मिळणार नाही. म्हणजेच, 1 नोव्हेंबरपासून सीएनजीची विक्री अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. या संपाबाबत पुणेकरांच्या मनात अनेक शंका आहेत. 


जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत सीएनजी पंपचालक संपावरच 


1 नोव्हेंबरपासून सीएनजी उपलब्ध न झाल्यास पुण्यातील वाहतूकीला मोठा फटका बसणार आहे. त्याप्रमाणे अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंच्या वाहतूकीवरही परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संपावर तोडगा लवकरात लवकर काढणं अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शुक्रवारी महत्त्वाची बैठकही पार पडली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एचपीसीचे कार्यकारी संचालक, आयओसी, बीपीसीएल आणि टोरेंट गॅस, पीडीए आणि जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत टोरंट सीएनजी पंप चालकांनी आपल्या मागण्या मांडल्या.