UP Election 2022 : काँग्रेस पक्षानं आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी त्यांच्या 41 उमेदवारांची दूसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 महिला उमेदवारांनी तिकीट देण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांनी 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची घोषणा केली होती.
आग्रा कॅन्टोन्मेंटमधून सिकंदर वाल्मिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुण वाल्मिकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी काँग्रेस वाल्मिकी यांना तिकीट देणार असल्याचे सांगितले होते. हेमंत चहर यांना फतेहपूर सिक्री येथून तिकीट देण्यात आले आहे.
या आधी काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर केली होती. या यादीमध्ये 50 महिला उमेद्वारांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश निवडणूकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत आराधना मिश्रा 'मोना', पूर्व केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांच्याबरोबरच सदफ जाफर आणि अन्य काही महिलांचा समावेश होता.
उन्नाव येथील आशा सिंह यांना देखील काँग्रेस पक्षानं तिकीट दिले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार असून सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 मार्चला होणार आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
हेही वाचा :
Maharashtra School : सोमवारपासून शाळा सुरु? आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha