Ashish Jaiswal on Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आलं आहे. सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा 1500 रुपयांचा निधी घेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा ई-केवायसीद्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Continues below advertisement

दरम्यान, या मुद्द्यावर राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी भाष्य कर प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थ्यांना फक्त योजनेतून बाहेर काढले जाईल. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलंय.

कोणा-कोणावर कारवाई करायची? हा सरकारपुढे प्रश्न- आशिष जयस्वाल

दरम्यान,  या योजनेत एकूण 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या. विधानसभा निवडणुकीनंतर शिल्लक राहिलेल्या 11 लाख अर्जांची तपासणी केल्यानंतर 7 लाख 76 हजार अर्ज अपात्र ठरले. जून महिन्यात सरकारने या योजनेचा सखोल आढावा घेण्याचे ठरवले. महिला व बालकल्याण विभागाने सर्व विभागांकडून माहिती मागविल्यानंतर फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला. दरम्यान याबाबत पुढे बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले कि, एक रुपया पीक विमा योजनेत पण अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. सर्व महाराष्ट्राचे नागरिक आहे, संख्या मोठी असल्याने कोणाकोणावर कारवाई करायची? हा सरकारपुढे प्रश्न असल्याचेही आशिष जयस्वाल म्हणाले.

Continues below advertisement

कोणत्या जिल्ह्यात सर्वांधिक फसवणुकीची आकडेवारी?

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४ हजार बोगस लाभार्थी आढळले. ठाण्यात 1 लाख 25 हजार 300, अहिल्यानगरमध्ये 1 लाख 25 हजार 753, नाशिकमध्ये 1 लाख 86 हजार 800, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 लाख 4 हजार 700, कोल्हापूरमध्ये 1 लाख 1400, मुंबई उपनगरात 1 लाख 13 हजार, नागपुरात 95 हजार 500, बीडमध्ये 71 हजार, लातूरमध्ये 69 हजार, सोलापूरमध्ये 1 लाख 4 हजार, साताऱ्यात 86 हजार, सांगलीत 90 हजार, पालघरमध्ये 72 हजार, नांदेडमध्ये 92 हजार, जालन्यात 73 हजार, धुळ्यात 75 हजार तर अमरावतीत 61 हजार बोगस लाभार्थी उघडकीस आले.

महत्वाच्या बातम्या: