Pune News : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून (Sinhagad Fort) गेल्या बुधवारी (20 ऑगस्ट रोजी) मित्रांसोबत फिरायला आलेल्या गौतम गायकवाड (Gautam Gaikwad) हा तरुण अचानक बेपत्ता झाला होता. त्यांनतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून (Pune Rural Police) त्या बेपत्ता तरुणाचा सातत्याने शोध घेतला जात होता. अखेर किल्ल्यावरून गायब झालेला तो तरुण सापडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असेल्या गौतम गायकवाडचा शोध लागला असून पुणे पोलिसांनी CCTV मार्फत त्याला शोधलंय. रविवारच्या संध्याकाळच्या सुमारास गौरव सापडला असून त्याला उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या 5 दिवसातील घटनाक्रम चोकशी अंती कळू शकणार आहे.
पाचव्या दिवशी शोधमोहिमेला यश, मात्र प्रकरणातील ट्विस्ट कायम
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा या कड्यावरून पडून गौतम गायकवाड बेपत्ता झाला होता. तो साताऱ्याच्या तरुण मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरायला आला असताना पाय घसरून तो दरीत कोसळला होता. त्याला शोधण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सिंहगड किल्ला आणि पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन, हवेली पोलीस प्रशासन कसून तपास घेत आहे. दरम्यान सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्हमधून एक नवी माहिती समोर आली होती कि, या सीसीटीव्हीमध्ये एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हापासून या सगळ्या परिसरात शोध सुरू असताना तेव्हा तो सापडला नाही, त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.
तरुणाने जाणून-बुजून बेपत्ता होण्याचा कट रचला?
दरम्यान, बेपत्ता झालेला गौतम सीसीटीव्हीमध्ये दिसत असेल आणि पोलिसांना सापडत नसेल तर हा सगळा प्रकार तरुणाने जाणून-बुजून केला असल्याचा संशय पोलिसांना आला. हवेली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यात आली होती. 24 वर्षांचा गौतम गायकवाड हा साताऱ्याचा असून, गेल्या पाच दिवसांपूर्वी तो मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरायला आला होता. तानाजी कड्यावरून तो पाय घसरून तो दरीत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले होते. तेव्हापासून पुणे ग्रामीण पोलीस, हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके त्याचा शोध घेत होते. पण तेव्हा त्याचा शोध लागलेला नाही. मात्र अखेर या तरुणाचा शोध लागला आहे.
ही बातमी वाचा: