Asaduddin Owaisi on Gyanvapi Mosque : काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानव्यापी मशीदीबाबत (Gyanvapi Mosque) काही निर्णय दिले होते. हिंदूच्या सुरु असलेल्या तळघरातील पूजेला स्थगिती देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. दरम्यान, ज्ञानव्यापी मशीदीबाबत (Gyanvapi Mosque)ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाष्य केलं आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांननी मशीदीबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
कायदेशीर लढाई लढणार
असुदुद्दीन ओवैसी म्हणाले, "आता मुस्लिम देशातील एकही मशीद हिंदूंकडे जाऊ देणार नाही. न्यायालयात कायदेशीर लढाई लढली जाईल. ज्ञानव्यापी मशीदीबाबतच्या खटल्याबाबत ओवैसी म्हणाले, मशीदीखाली पूर्वी मंदिर होते, असा दावा हिंदूकडून केला जात आहे. " मात्र आम्ही कुठलीही मशीद देणार नाही.आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. आमची या देशात एकदा फसवणूक झाली आहे. आम्ही पुन्हा फसले जाणार नाहीत."
ज्ञानव्यापीच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना प्रार्थना करण्यास मुभा
उत्तरप्रदेश येथील बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी जमावाकडून पाडण्यात आली होती. १६ व्या शतकात या ही मशीद बांधण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षांच्या न्यायालयाीन प्रक्रियेनंतर तिथे राम मंदिर बांधण्यात आले आहे. दरम्यान, आता न्यायालयाने ज्ञानव्यापी मशीदीबाबत एक निर्णय दिलाय. या निर्णयानुसार, "ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) दक्षिणेकडील तळघरात हिंदू पुजारी प्रार्थना करू शकतात." ज्ञानव्यापी मशीदीबाबत काही तोडगा निघू शकतो का? असा सवाल असुदुद्दीन ओवैसी यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ओवैसी म्हणाले, "मी स्पष्टपणे सांगतो की, आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि आमच्याकडे कोणती कागदपत्रे आहेत आणि आमचे दावे काय आहेत? हे न्यायालयात सांगणार आहोत."
राष्ट्रपती भवन खोदण्यास सुरुवात केली तर आम्हालाही काहीतरी सापडेल
ज्ञानवापी मशिदीच्या खाली हिंदूच्या काही खूणा सापडल्या आहेत. यावर बोलताना ओवैसी म्हणाले, "उद्या जर आम्ही राष्ट्रपती भवन खोदण्यास सुरुवात केली तर आम्हाला काहीतरी सापडेल.आम्ही शेकडो वर्षांपासून या ठिकाणी नमाज अदा करत आहोत. मी हे संसदेत बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो की,हा मुस्लिमांचा प्रश्न आहे.आम्हाला आमच्या पंतप्रधानांवर विश्वास राहिलेला नाही. पंतप्रधान केवळ एका विचारधारेसाठी काम करतात." अयोध्येत शांततेत राम मंदिराची निर्मिती झाली. त्याप्रमाणे ज्ञानवापीबाबत मुस्लिम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. मशीद दुसरीकडे बांधावी, असे राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, देशातील मुस्लिमांना धमकावले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या