Arjun Kapoor Malaika Arora : मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा दुरावा आल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या 8 वर्षांपासून हे दोघेही एकत्र होते. पण आता या दोघांनीही हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण ते दोघेही त्यांच्या नात्याला एक संधी देण्याचा निर्णय घेत असल्याचंही म्हटलं जात होतं. पण आता अखेर यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिल्याची माहिती समोर आली आहे. 


पिंकविलाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुनने सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचं नातं सन्मानपूर्वक संपवण्याचा निर्णय घेतला आहे. एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुनचं नातं खूपच खास होतं. तसेच दोघांच्या आयुष्यात एकमेकांसाठी खूप स्पेशल जागा होती आणि ती कायम राहिल. 


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर झाले वेगळे


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही यावर मौन बाळगणं पसंत केलं आहे. कारण त्यांना असं वाटत नाही की, त्यांच्या नात्यावर कोणतीही टीका-टीप्पणी केलेली नकोय. सूत्रांनी पुढेही म्हटलं की, त्याचं नातं बराच काळ टिकलं, पण आता ते संपलं आहे. 






मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. गेल्या काही महिन्यांपासून मलायकाचं नाव अर्जुनसोबत जोडलं जात आहे. मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते.  तर अर्जुनने 'इश्कजादे' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.                            






ही बातमी वाचा : 


Mrunal Dusanis : 'मी बोल्ड सीन्स करेन पण...', आजवर सोज्वळ व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मृणालने मांडली स्पष्ट भूमिका