मुंबई: बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर पाचव्या दिवशी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मंत्रालयात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांकडून अडत घेतली जाणार नाही, असं या बैठकीत ठरवण्यात आलं. त्याला व्यापाऱ्यांनीही मान्यता दिली.
मात्र जो नियम बाजार समितीच्या बाहेर विक्रीसाठी आहे, तोच नियम बाजार समितीच्या आतमध्ये सुद्धा लागू व्हावा, बाजार समितीच्या आवारात विक्री करण्यासाठी नियमन मुक्ती मिळावे, यासाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात येणार आहे.