लंडनः टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी खास त्याच्या हेलिकॉप्टर शॉटसाठी ओळखला जातो. मात्र केवळ धोनीच नव्हे तर इंग्लंडची महिला खेळाडू देखील हेलिकॉप्टर शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध झाली आहे.
दिग्गज क्रिकेटर धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न करतात. कोणालाही धोनीसारखा शॉट आजपर्यंत जमलेला नाही, असं क्रिकेट समीक्षकांचं म्हणणं आहे. मात्र इंग्लंडची महिला खेळाडू लॉरेन विनफील्ड हा शॉट खेळण्यात पारंगत आहे.
हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी विशेष तंत्राची गरज असते, जी केवळ धोनीकडे आहे. त्यामुळे जगातील क्वचितच खेळाडू हा शॉट मारण्यात यशस्वी होतात. इंग्लंड-पाकिस्तान टी-20 सीरीजमध्ये लॉरेनने अनेकदा हा शॉट खेळून चाहत्यांना धोनीची आठवण काढण्यास भाग पाडलं.