अहमदाबाद: अहमदाबादमध्ये अंजुमन-ए-इस्लाम या शाळेतील विद्यार्थिनी दररोज योग करत आहेत. येथील विद्यार्थिनींच्या मते, अध्यात्मिक शिस्तिमध्ये कोणताही धर्म येत नाही. पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरु असतानाही येथील विद्यार्थिंनी या दररोज 30 मिनिटं योगा करतात.


योगा करण्यानं रोजाचे उपवासात फायदाच होतो. न्यूज एजन्सीच्या एएनआयच्या मते, विद्यार्थिनींचं म्हणणं आहे की, "आपण सगळेच जाणतो की, योगचे बरेच फायदे आहेत. हे कोणत्याही धर्माशी जोडलेलं नाही. योगा कोणीही करु शकतं. योग आपल्याला स्वस्थ राहण्यास मदत करतं. रमजानच्या उपवासात आम्ही काहीही खात अथवा पित नाही अशावेळी योगाचा खूपच फायदा होतो."

शाळेतील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक मल्लिक हुस्सैनबाई यांच्या मते, "विद्यार्थ्यांना व्यायाम केल्यानं बराच फायदा होतो. आम्ही विद्यार्थ्यांना पूर्णपणे सूट दिली आहे. की त्यांनी ओकांराचा जप करायचा अथवा नाही. काय ते त्यांनी ठरवायचं आहे."

भारतात दरवर्षी 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो. 11 डिसेंबर 2014 रोजी राष्ट्रसंघांनं योगाला आंतराष्ट्रीय दिवस घोषित केलं होतं.