पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. हत्या प्रकरणात संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आलेले वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होते. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते. वाल्मिक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. 


दरम्यान सीआयडीसमोर सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी स्वत: आपली प्रतिक्रिया देत  भाष्य केलं आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात अनेक धक्कादायक दावे करत टीकेची झोड उठवणाऱ्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.


तर हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणारा आहे- सुषमा अंधारे


शरण येणं किंवा आत्मसमर्पण करणे हा शब्दप्रयोग प्रसारमाध्यमे वापरत आहेत. या कृतीला आत्मसमर्पण हा शब्दप्रयोग होत असेल तर हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणार आहे. कारण ज्या प्रकरणाने अधिवेशन गाजवलं होतं, असंख्य आमदारांनी यावर भाष्य केलं होतं. सत्ताधारी पक्षातील  नेत्यांनी ही त्यावर भाष्य केलं. तसेच लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यानंतर चौकशी संदर्भात उपायोजना केल्याचं सांगण्यात आले.  त्या घटनेचा कुणालाही माघमुस लागला नाही. मात्र शरण येणार आहेत याचे मेसेज सर्वत्र प्रसारित झाले. म्हणजे पोलीस सोडून सर्वांना सगळं काही माहिती होतं. अशी शंका व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वाल्मिक कराडांच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 


हा प्लॅनिंग करून शरण येण्याचा कट- अंजली दमानिया


वाल्मिक कराड यांना शरण येण्याचा अखेर आज मुहूर्त मिळाला म्हणायचं. कारण मागील दोन दिवसापासून ते शरण येणार अशा बातम्या आपण ऐकत होतो. मात्र हा प्लॅनिंग करून शरण येण्याचा कट आहे. हे सर्व ऐकून थोडीशी गंमत वाटली. म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा ही दोन दिवस त्यांच्या टच मध्ये होती का? त्यांना कुठून कळलं की आज ते शरण येणार आहेत? मला हे सर्व विचार करून त्रास होतो आहे की जो माणूस 17 तारखेला ज्याचे कॉल ट्रेकिंग केलं त्यानुसार तो पुण्यात होता.  आणि आज 31 तारखेला हाच व्यक्ती पुण्यात सरेंडर करतो. याचा अर्थ  म्हणजे तो गेल्या दोन आठवड्यापासून पुण्यातच होता आणि तो सीआयडी, पोलिसांना  मिळाला नाही. आणि दोन दिवस झाले पोलिसांना कळतं की तो सरेंडर होणार आहे. म्हणजे वाल्मीक कराड सारख्या माणसाला राजकीय सरातून पाठबळ मिळत आहे हे त्यातून स्पष्ट होतं.


जेव्हा बारा वाजताचा मूर्त त्यांना  समर्पण करण्याचा मिळाला, मात्र त्या संदर्भाच्या बातम्या या सकाळपासून येत आहेत. येतो पोलिसांच्या संपर्कात कुठे ना कुठे होता. किंबहुना गेल्या पंधरा तारखेपर्यंत त्याला पोलीस संरक्षण होतं. याबाबत मी पोलिसांना विचारणा केली असता  त्यांना पळून जाण्याची मुभा देण्यात आली का? अशी शक्यता आहे. मुळात खंडणीच्या गुन्हा त्यांना तात्काळ अटक करणे अपेक्षित होतं. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. यात कुठेतरी राजकीय लागेबंध आहेत. याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. 


हे ही वाचा