Amravati News : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे (Sambhaji Bhide Controversy) त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे यांना कायदेशीर नोटिस बजावली आहे. संभाजी भिडे यांना आठ दिवसात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस दिली आहे. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भिडे यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पोलिसांनी संभाजी भिडे यांनी कायदेशीर नोटिस बजावली आहे.


संभाजी भिडे यांना पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी नोटिस


पोलीस संभाजी भिडे यांच्या आवाजाचे सॅम्पल घेणार आहेत. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप पोलीस तपासणार आहेत. वादग्रस्त ऑडिओ क्लिप संभाजी भिडे यांच्याच आवाजाची आहे का यासाठी भिडे यांच्या खऱ्या आवाजाचे सॅम्पल घेऊन फोरेन्सिकमध्ये पाठवण्यात येणार आहे. यासंबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीआरपीसी कलमानुसार संभाजी भिडे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 


अमरावतीमध्ये यशोमती ठाकुरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन


संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे यशोमती ठाकुर यांनी यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी अल्टिमेट दिला होता. मात्र तरीही त्यांना अटक न केल्याने काँग्रेस झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर र शेकडो कार्यकर्त्यांनी संभीजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभरात काँग्रसकडून आंदोलनं करण्यात येत असून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी देखील जोर धरत आहे. त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यांवर कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


संभाजी भिडेंच्या विरोधात राज्यभरात आंदोलनं


संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात आंदोलनं (Protest) करण्यात येत आहेत. भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे सांगली, अमरावती, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. अमरावतीमध्ये यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले. तर सांगतील पुरोगामी पक्ष आणि संघटनेसोबत काँग्रेसने देखील भिडे गुरुजींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तसेच काँग्रसेकडून आता भिडे गुरुजींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.