Yashomati Thakur Death Threat : आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे. संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महापुरुषांबद्दल काही अपशब्द वापरल्याने काँग्रेस आणि विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी अमरावती पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. या संदर्भात काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.


यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा यवतमाळमधील 


यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतर्गत शेंबाळ पिंपरी येथील कैलास सूर्यवंशी यांनी ट्विटर वरून यशोमती ठाकूर यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवीत आरोपी हा यवतमाळ जिल्ह्यातील शेबळापिंपरी येथील असल्याची माहिती मिळताच अमरावती पोलीस पथक शेंबाळ पिंपरी येथे दाखल झाले होते. मात्र, आरोपी फरार असल्याने पोलीस पथक आल्या पावलीच पोलीस अमरावतीला परत गेले आहेत. दरम्यान, पोलीस आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांनी दिली.


धमकीनंतर यशोमती ठाकुरांच्या घरी सुरक्षा


काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापाठोपाठ आता आज काँग्रेसच्या नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर यांनाही ट्विटरवरून धमकी देण्यात आली आहे. आमदार यशोमती ठाकूरांनी एबीपी माझाली ही माहिती दिली.. या तक्रारीची गंभीर घेत अमरावती पोलीसांनी यशोमती ठाकूर यांच्या घरी पोलीस सुरक्षा लावली आहे.. दिवसा 4 पोलीस कर्मचारी आणि रात्री 4 असे आठ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.


पाहा व्हिडीओ : यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्या कैलास सुर्यवंशीवर गुन्हा दाखल



 

कैलास सूर्यवंशीवर गुन्हा दाखल


ट्विटरवर आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्या कैलास सूर्यवंशीवर अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कलम 504 (1,B) 506, 507 अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या वतीने हरिभाऊ मोहोड यांनी तक्रार दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sambhaji Bhide : संभाजी भिडेंवर अमरावतीत गुन्हा दाखल, महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाचे पडसाद