अमरावती : दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या पत्नी आणि सध्याचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gawai) यांच्या आई कमलताई गवई (Kamaltai Gawai) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार की नाही या विषयावर आता पडदा पडला आहे. आपली प्रकृती ठिक नसल्याने अमरावतीमध्ये होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं कमलताई गवई यांनी म्हटलं आहे. आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलं आहे, पण एका कार्यक्रमामुळे आपल्याला कलंकित करण्याचा प्रयत्न केला गेल्याची खंतही कमलताई गवई यांनी व्यक्त केली.
कमलताई गवईंनी एका जाहीर पत्राच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचार मांडणे हे शेवटचा श्वास असेपर्यंत सोडणार नाही, हीच आंबेडकरी चळवळीची ताकद आहे असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
RSS Amravati Dasara Programme : निमंत्रण पत्रिकेवरुन वाद
दसऱ्याच्या निमित्ताने, 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अमरावतीमध्ये विजयादशमी कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कमलताई गवई यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावरुन मोठा वाद सुरू झाला. त्यानंतर आता या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं कमलताई गवईंनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जर आपण गेलो असतो तर त्या व्यासपीठावर आंबेडकरी विचार मांडण्याची संधी मिळाली असती. या आधी रा सू गवई यांनीही अशा वेगवेगळ्या व्यासपीठावर जाऊन आंबेडकरी विचार मांडले असल्याचं कमलताई गवईंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
Dr. Kamaltai Gawai : आंबेडकरी विचार मांडले असते
माझे पती दादासाहेब गवई हे जाणून-बुजून अशा विरोधी मंचावर जायचे, तिथे वंचितांचे प्रश्न मांडायचे, तिथे आंबेडकरी विचार मांडायचे. मी आरएसएसच्या कार्यक्रमात गेले असते तर आंबेडकरी विचार मांडले असते. पण त्यावरुन झालेल्या चर्चेमुळे, कुठल्याही शंका पोसल्या जाऊ नयेत म्हणूनच 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमास जाणार नाही असं कमलताई गवई यांनी म्हटलं आहे.
Dr. Kamaltai Gawai RSS Programme : नेमकं काय म्हटलंय कमलताई गवईंनी?
आम्ही आंबेडकरी विचारधारेत लीन झालेलो असून आंबेडकरी चळवळीत समर्पित आहोत. दुसऱ्या विचारधारेच्या मंचावर आपल्या विचार मांडणे गरजेचे असते. रा. सू. गवई यांनी अशा विशेषी मंचावरून आंबेडकरी विचार व आंबेडकरी चळवळीत योगदान मांडण्यास हा त्यांचा धारणांचा भाग होता.
तरीही महाराष्ट्र आणि सुस्पष्टपणे दशक्रांतीकारक गवई यांच्या त्या पवित्रतेला वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघून टोकाचा विचार होणे ही अनुचित होईल. परंतु आम्ही मात्र आंबेडकरी चळवळीत आणि विषयभानतेत लीनच राहिलो आहोत. कुठल्याही शंका पोसल्या जाऊ नयेत म्हणूनच 05 ऑक्टोबरच्या कार्यक्रमास जाणार नाही.