अमरावती : आंतरधर्मीय विवाहाबाबत खासगी विधेयक मांडणार असल्याची माहिती भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी एबीपी माझासोबत (Abp Majha) बोलताना दिली. शिवाय आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही खासदार बोंडे म्हणाले.


खासदार बोंडे म्हणाले, "अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांड मधील आरोपी देखील लव्ह जिहादला प्रोत्साहित करायचा. त्याने इंदोर मधील मुलगी पळून आणली होती. शिवाय मेळघाट मधील मुलींना प्रलोभनं देऊन किंवा धमक्या देऊन पळवून घेऊन जातात. यावर मी एक बिल आणणार आहे. बोगस संस्था हे विवाह लावून देतात, यात खोटा मौलवी उभा केला जातो. अमरावतीची जी मुलगी पळून गेली होती त्या मुलीच्या आई-वडिलांनी रडत- रडत मला फोन केला होता. आमच्या मुलीला शोधा अशा विनवण्या त्यांच्याकडून करण्यात येत होत्या. त्यानंतर ते खासदार नवनीत राणा यांच्याकडे गेले. त्यानंतर नवनीत राणा या पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत पोलिसांना जाब विचारला असेल तर त्यात वावगं काय? 


गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीची मुलगी पश्चिम महाराष्ट्रात सापडली होती. याबाबत बोंडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ती मुलगी साताऱ्यात कशी सापडली? कोणाच्या मदतीने पोलिसांना ती सापडली? ज्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते त्याच मुलाच्या मोबाईलमधून ती कुठं आहे हे कळलं? हे सर्व समोर आणलं पाहीजे, असं मत अनिल बोंडे यांनी यावेळी व्यक्त केलं. 


दरम्यान, या आधी देखील अनिल बोंडे यांनी दिल्लीत माध्यमांसोबत बोलताना आपण लव जिहाद बाबत अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचे म्हटले होते. "राज्यात सध्या ‘लव जिहाद’ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचे अनिब बोंडे यांनी दिली होती.  


"लव जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांडनंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले त्याचाही लव जिहाद प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले आहे. मेळघाटातातील आदिवासी मुलींना फसवून पळवून आणलं जातं. मुलींनी विरोध केला तर त्यांना जीवही गमवावा लागतो, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला होता.



महत्वाच्या बातम्या


Amravati Crime : उमेश कोल्हेंच्या हत्येतील मुख्य आरोपीला बलात्कारच्या गुन्ह्यात जेल, 'लव जिहाद' चा आरोप