अकोला: मोहन भागवतांचे (Mohan Bhagwat) भाषण म्हणजे चोराच्या मनातले चांदणे... आपल्या हातात सत्ता आल्यास आपण नरेंद्र मोदी आणि भागवतांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. ते आकोल्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात आज मुख्य भाषण केलंय. ते अकोला येथे बोलत होते. या भाषणात डॉ. भागवत यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मत घेतले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भागवतांच्या याच भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आपल्याला सत्ता मिळाली तर आपण मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, रावणदहनाची प्रथा थांबवली जावी असंही आंबेडकर म्हणालेय. यासाठी संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आंबेडकरांनी केलंय. 


मोहन भागवत यांच्या भाषणावर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?


- लोकांची मन खराब करणारे तेच आहेत. मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं. 
- त्यांनी मणिपूरमध्ये त्यांनी तेच केलं, मुसलमानांच्या संदर्भात त्यांनी तेच केलं, औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर कारवाई करणारे तेच आहेत. 
- दंगा माजवणारं आरएसएसच आहे. त्यामूळे आरएसएसने लोकांना आधीच सांगितलं की आम्ही दंगली माजवून मतं घेणार आहोत. 
- ही निवडणुकीसाठीची सावरासावर. संघ आणि भाजप एकच. मोहन भागवत म्हणजे मोदी अन मोदी म्हणजे मोहन भागवत. 
- आपण सत्तेत आल्यास बेकायदेशीर शस्त्रपूजन करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरूंगात पाठवू. 


प्रकाश आंबेडकर संघाच्या शस्त्रपूजेवर काय म्हणाले?


- नागपुरातला संघाचा दसरा मेळावा शस्त्रांची पूजा करणारा मेळावा. कारखानदार यंत्रांची अन लष्कर शस्त्रांची पूजा करते. परंतू संघ शस्त्रपूजा का करते?, हे स्पष्ट व्हावं. 
- आमचा अकोल्यातील दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घेत असलेला मेळावा हा लोकांचा कार्यक्रम. यात लोकांचे कार्यक्रम अन लोककल्याणाची दिशा. 


रावण दहनावर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? :


- रावण दहनाला आदिवासींचा विरोध. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाकडे पहावं. 
- पूर्वी दक्षिणेत रामदहनाचे कार्यक्रम व्हायचे. नेहरूंनी मध्यस्थी केल्याने ही प्रथा थांबली. 
- आदिवासींची ही मागणी हिंदुत्ववादी संघटनांना आवाहन आहे की त्यांनी ही प्रथा थांबवावी. 
- रावणदहन कार्यक्रम थांबवण्यासाठी संघानं पुढाकार घ्यावा. धर्म सकारात्मक बाबींवर चालावा, नकारात्मक बाबींवर नव्हे. 


ही बातमी वाचा: