मुंबई: सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि शिवा मोहोड (Shiva Mohod) यांच्यातील मतभेद पुन्हा उफाळून आल्याचं दिसून येतंय. शिवा मोहोड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी (Akola NCP) निवड होताच अमोल मिटकरींनी वळसे पाटलांसमोर (Dilip Walse Patil) केला नियुक्तीचा निषेध केला. तसेच आमदाराकीचा राजीनामा देण्याचीही धमकी दिली. यानंतर कार्यक्रम स्थळी गोंधळ निर्माण झाला. 


गेल्या वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांनी एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर आज शिवा मोहोड यांची अजित पवार गटाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केली. त्यावेळी स्टेजवरच उपस्थित असलेल्या अमोल मिटकरी यांनी त्याचा निषेध केला आणि आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची धमकीही दिली. 


दिलीप वळसे पाटलांसमोरच निषेध


आमदार अमोल मिटकरी यांचे कट्टर विरोधक समजले जाणाऱ्या शिवा मोहोड यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी चांगलेच संतापले. त्यावेळी स्टेजवर दिलीप वळसे पाटील होते. त्यांच्यासमोरच अमोल मिटकरींनी या निवडीचा निषेध केला. अमोल मिटकरी म्हणाले की, "जोपर्यंत मला विश्वासात घेतलं जात नाही तोपर्यंत ही निवड मानली जाणार नाही. या निवडीचा मी निषेध व्यक्त करतो आणि त्याची तक्रार अजितदादांकडे केली जाईल."


Amol Mitkari Vs Shiva Mohod : अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड वाद काय? 


गेल्या वर्षी शिवा मोहोड यांनी अमोल मिटकरी हे कामासाठी कमिशन घेत असल्याचा थेट आरोप केला होता. यासोबतच एका महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे? असा सवाल मिटकरींना उद्देशून करण्यात आला होता. तर मिटकरींनी आरोप फेटाळत शिवा मोहोडांना सूचक इशारा दिला होता. 


अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील वाद राज्यभरात गाजला होता. नंतर मिटकरी आणि मोहोड यांच्यातील वाद नवीन वळणावर पोहोचला. आमदार मिटकरींनी आपले व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि इतर व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता लक्षात घेत अकोला सायबर पोलिसांत तक्रार दिली होती.


ही बातमी वाचा: