अकोला : मनसेचे सरचिटणीस आणि अकोला विधानसभा निरीक्षक कर्णबाळा दुनबळे (Karnbala Dunbale) यांनी मनसैनिकांना चिथावणी देणारा व्हिडीओ समोर आला आहे. यात मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींना तुडवलं नाही तर त्यांची पदं काढण्याची धमकी दुनबळे यांनी कार्यकर्त्यांना दिली. यानंतरच अकोल्यात राडा झाला आणि मनसे कार्यकर्ता जय मालोकार (Jay Malokar ) याचा जीव गेला.
MNS Akola Video : काय म्हणाले मनसे सरचिटणीस?
राज ठाकरेंना विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे. सरळ नेता, शब्द पाळणारा नेता अशी ओळख आहे. काही निर्णय इकडे-तिकडे झाले असतील. 50 हजारांच्या पगारावरती अमोल मिटकरीचं घर चालतंय हे जितेंद्र आव्हाड म्हणाला. त्याची ही औकात आहे आणि तो राज ठाकरेंवर बोलतोय. तू तुझी औकात ओळख. आपलं ठेवतो झाकून आणि दुसऱ्यांचं ठेवतो वाकून. त्याच्या घरावर बोलणार नाही, मी तसं बोलणार नाही.
येत्या आठ दिवसात मी आणि माझे मनसेचे शिलेदार मिटकरीला भेटेल तिथे तुडवल्याशिवाय राहणार नाही. तुडवणारच. यांनी जर त्याला तुडवलं नाही तर यांना पदमुक्त करण्याची जबाबदारी माझी. टीका करा, पण मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल तर त्याला सोडणार नाही.
चिथावणीनंतर अकोल्यात राडा
अमोल मिटकरींना तुडवण्याचा आदेश दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. त्यावेळी अमोल मिटकरी हे गाडीत नव्हते. मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींची गाडी फोडली. अकोल्यात झालेल्या या राड्यानंतर पोलिसांनी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. त्यामध्ये जय मालोकार याचाही समावेश होता.
अकोल्यात ज्यावेळी राडा झाला त्यावेळी जय मालोकारला अस्वस्थ वाटू लागलं. या प्रकरणातील इतर आरोपी फरार झाले पण जय मालोकारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची तपासणी केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं. पण उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.
कोण आहे जय मालोकार?
- जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष.
- सध्या परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला.
- अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास.
- गेल्या पाच वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत.
ही बातमी वाचा: