Akola Latest News Update : 'महाबीज' संचालक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मतपत्रिका ठेवण्यात आलेल्या रूमचे सील' तुटलेले आढळल्याने गोंधळ उडाला होता. उमेदवारांनी आक्षेप नोंदवत केली चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ 'महाबीज'च्या दोन संचालक पदाची निवडणूक सप्टेंबर महिन्यात पार पडली. विदर्भ विभाग मतदार संघातून डॉ. रणजित सपकाळ, प्रशांत गावंडे, तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख, वकील विष्णुपंत सोळंके यांच्यात लढत आहे. दरम्यान, मतपत्रिका, ओळखपत्र पाठविण्याची तारीख 12 ऑगस्ट होती. तर मतपत्रिका स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर होती. त्यानुसार 15 सप्टेंबर पासून ते 21 सप्टेंबर दरम्यान मतपत्रिका वैध मतपत्रिकांची आणि छाननी म्हणजेच मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे, आजचा मतमोजणीचा तिसरा दिवस होता. मात्र मतमोजणी दरम्यान एका रूमचे सील उघडे असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे आज ही मतमोजणी प्रक्रिया थांबवून उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
मतमोजणी प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप -
या प्रकारानंतर 'महाबीज' मुख्यालयामध्ये गोंधळ उडाला होता. ज्या 'स्ट्राँग रूम'मध्ये मत पत्रिका ठेवण्यात आल्या होत्या, त्या खोलीला चार दरवाजे असून यातील एका दरवाज्याचं सिल तुटलेल्या स्थितीत निदर्शनास आले. 'महाबीज'च्या व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयातील रेस्टरूममध्ये निघणाऱ्या दरवाज्याचं सील तुटलेल्या स्थितीत निदर्शनास आलेत. नेमके हे 'सील' कशामुळे तुटलं?. 'सील' तोडायचा उद्देश काय होता?, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान, संचालक पदांच्या जागांचाटी मतमोजणी व निकाल 22 आणि 23 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.
काय आहे उमेदवारांचा आरोप?
महाबीजच्या संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. 15 तारखेपासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली होती. आजचा तिसरा दिवस होता. जेथे मतपत्रिका ठेवल्या होत्या. तेथील एका बाजूचा दरवाजाचे सिल हे सकाळी तुटलेल्या आढळले, म्हणून आम्ही उमेदवारांनी या संदर्भात चौकशी व्हावी, असा आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया काहीवेळासाठी थांबली होती दुपारनंतर ती पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे. या संदर्भात प्रशासन चौकशी करेल. असेही प्रशासनाने कळवले आहे, असे उमेदवार (विदर्भ विभाग) प्रशांत गावंडे यांनी सांगितलं.
काय म्हणतंय 'महाबीज' प्रशासन? :
महाबीज मुख्यालयात मतपत्रिका संदर्भात जो प्रकार निदर्शनास आला त्याबाबत व्हिडिओ ग्राफी करण्यात आली आहे. त्यानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये असलेल्या पेट्यांचे सील हे व्यवस्थित असल्याने कोणताही गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले नाही, याबाबत उमेदवारांना खात्री पटवून देण्यात आली आहे, तरीही कायदेशीर कारवाई संदर्भात संबंधितांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी विनय वर्मा यांनी दिली.