अकोला : राज्यात सध्या 'ऑक्टोबर हिट'चा (October Heat) प्रकोप वाढला आहे. ऑक्टोबर हिटच्या गरमीमुळे नागरिक बेहाल झालेयेत. याच ऑक्टोबर हिटचा मोठा फटका संपुर्ण विदर्भाला बसलाय. यामुळे दैनंदिन जीवन प्रभावीत झाली आहे. देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक असलेल्या अकोल्यातही (Akola News) ऑक्टोबर हिटचा मोठा प्रभाव पहायला मिळत आहे. ऐन थंडीची चाहूल लागण्याआधी अकोल्याचा पारा 38 अंशांपर्यंत गेला आहे.
ऑक्टोबरमधील वाढत्या उष्म्याने अकोलेकरांना चांगलाच घाम फोडला आहे. अकोला जिल्हा आधीच उष्णता असताना आता त्यात ऑक्टोबर हिटची भर पडलीय. त्यामुळं वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. अकोल्याचे तापमान 38 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या सात दिवसांत अकोल्यात नोंदवण्यात आलेलं तापमान
दिनांक | तापमान (सेल्सियस अंशांमध्ये) |
10 ऑक्टोबर | 37.2 |
11 ऑक्टोबर | 37.2 |
12 ऑक्टोबर | 37.5 |
13 ऑक्टोबर | 37.2 |
14 ऑक्टोबर | 37.8 |
15 ऑक्टोबर | 37.0 |
16 ऑक्टोबर | 36.5 |
विदर्भात घामाच्या धारा
अकोला नाही तर हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी त्यापाठोपाठ वर्धा हे दोन जिल्हे 36 अंश सेल्सिअस वर आहे. तापमान अचानक वाढले तर वातावरणात उष्मा वाढल्याने चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर ,अकोला आणि, वर्ध्यात तापमानात वाढ झाली. वर्ध्याचे तापमान 36 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.
तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता
तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मॉन्सून देशाभरातून परतीच्या वाटेवर आहे. किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता थंडीची प्रतीक्षा आहे. देशभरात बुधवारपासून अधिक उकाडा वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक बसण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत आज आणि उद्या ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.