Ajay Shrivastav : भारत सरकारने 1993 मध्ये मुंबईत (Mumbai) झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड, दहशतवादी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या मालमत्तांचा लिलाव केलाय. शुक्रवारी रत्नागिरीतील दाऊदच्या 4 मालमत्तांवर बोली लावण्यात आली. यातील 2 मालमत्तांचा यशस्वीपणे लिलाव झाला तर 2 मालमत्ता विकल्या गेलेल्या नाहीत. दहशतवादी दाऊद इब्राहिमची आई अमीना बी हिच्या नावावर रत्नागिरीच्या (Ratnagiri) खेड (Khed)तालुक्यातील मुंबके या गावी 4 मालमत्ता होत्या. या लिलावात शिवसेना नेते आणि वकिल अजय श्रीवास्तव यांच्यासोबतच आणखी 6 लोक सामील झाले होते.
अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली दाऊदची मालमत्ता
दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) लिलाव करण्यात आलेल्या मालमत्ता अजय श्रीवास्तव यांनी खरदी केल्या आहेत. श्रीवास्तव हे पेशाने वकिल आहेत. त्यांनी दाऊदचे लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या घर खरेदी केले आहे. दरम्यान, दाऊदची रत्नागिरीमध्ये जमिन आहे. या जमिनींवर मात्र, कोणीही बोली लावलेली नाही. दरम्यान, इतर 2 मालमत्ता अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केल्या आहेत.
दाऊदच्या मालमत्तेचे श्रीवास्तव पुढे काय करणार?
शिवसेना नेते अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या (Dawood Ibrahim) अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. दाऊद राहत होता ते घर देखील त्यांनी विकत घेतलंय. या शिवाय 2001 मध्ये दाऊदचे दुकानही अजय श्रीवास्तव यांनीच खरेदी केले होते. अजय श्रीवास्तव म्हणातात, मी सनातन धर्माचे पालन करतो. दाऊदच्या घरात मी सनातन शाळा सुरु करणार आहे. मात्र, सध्या मालमत्तेवर शाळा बांधण्यासाठी अनेक कायदेशीर कारवाया कराव्या लागणार आहेत. त्याची पूर्तता झाली की, शाळा सुरु करण्यात येईल.
दाऊदच्या एका मालमत्तेवर 2.01 कोटींची बोली
एका मालमत्तेसाठी 2.01 तर दुसऱ्या मालमत्तसाठी 3.28 लाखांची बोली लागली. तर इतर 2 मालमत्ता विकल्या गेलेल्या नाहीत. अर्थ मंत्रालयाच्या राजस्व विभागाद्वारे मुंबईतील (Mumbai) आयकर कार्यालयात (Income Tax Office) हा लिलाव पार पडला. महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात त्याची जमीन होती. या जमिनीचा लिलाव आज पार पडला. यावर 19 लाखांची बोली लागली. लिलाव करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेमध्ये दाऊदच्या घराचाही समावेश आहे. या घरातच त्याने लहानपण घालवले होते.
दाऊद जगातील सर्वात श्रीमंत गँगस्टर
दाऊदचा इब्राहिम (Dawood Ibrahim) पाकिस्तानात राहून तिथून त्याच्या काळ्या कारवाया करतो. अनेद देशात कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे त्याचे काळे धंदे सुरू आहेत. या काळ्या धंद्याच्या जोरावर दाऊद जगातील सर्वात श्रीमंत गँगस्टर बनला आहे. फोर्ब्ज मासिकाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2015 साली दाऊदची संपत्ती जवळपास 6.7 बिलियन डॉलर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
राजा विक्रमादित्यला गोमाताने दाखवला राम जन्मभूमीचा मार्ग, जाणून घ्या राम जन्मभूमीची आख्यायिका