संगमनेर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्यावर भाजप नेते सुजय विखे यांच्या सभेत वसंत देशमुखांनी (Vasant Deshmukh)  आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. देशमुख यांच्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ करत देशमुखांना अटक कार्नायची मागणी केली. रविवारी पोलिसांनी वसंत देशमुखांना अटक केली. आता आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे. 


धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. काल पुण्यातुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वसंत देशमुखांना अटक केली. वसंत देशमुखांना अटक झाल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता संगमनेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. 


वसंत देशमुखांना जामीन मंजूर


याबाबत संगमनेरचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे म्हणाले की, वसंत देशमुख यांची अटकेपूर्वी तब्येत बिघडल्याने आणि त्यांची बायपास झालेली असल्याने संगमनेर येथे प्राथमिक तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात भरती करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांना नाशिकमध्ये नेण्यात आले. आज सकाळी त्यांना संगमनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वसंत देशमुखांना जामीन मंजूर केला असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्यांना अतिरिक्त पोलीस आदिक्षक कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


नेमकं काय आहे प्रकरण? 


भाजप नेते सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील एका सभेत वसंत देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सभेत देशमुख यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर खालच्या भाषेत टीका केली. भर मंचावर आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंतर खाली बसलेल्या श्रोत्यांनीही आनंदात टाळ्या वाजवल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीसाठी जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्याबाहेर तब्बल 12 तास ठिय्या मांडला होता. यानंतर पोलिसांनी वसंत देशमुखांना अटक केली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Elections 2024 : '50 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला, अशी ब्रेकींग 23 तारखेला लागली पाहिजे', विखे पाटलांच्या होमग्राउंडवर निलेश लंके गरजले


Radhakrishna Vikhe Patil : 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले