राहाता : पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तसेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते आज (५ ऑक्टोबर) होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच शहा प्रवारानगर येथे सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी आले होते, आणि आता अल्पावधीतच ते पुन्हा येत आहेत. त्यांच्या या सलग भेटींमुळे विखे परिवार आणि अमित शहा यांच्यातील वाढती जवळीक अधोरेखित होत असून, ही नातेदारी सहकार क्षेत्रातील भविष्यातील समीकरणांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र अमित शाह (Amit Shah) आणि विखे परिवाराची जवळीक ही फक्त आत्ताची नव्हे तर तीन पिढ्यांची ही जवळीक आहे. जाणून घेऊया सविस्तर
Amit Shah and vikhe patil: शाह आणि विखे परिवाराची तीन पिढ्यांची जवळीक
- माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील अर्थ राज्यमंत्री असताना अमित शाह गुजरात मधील बँकांच्या प्रश्नासंदर्भात प्रथम भेटले.- राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे विरोधीपक्षनेते असताना मोदींच्या शिर्डी दौऱ्यात विमानतळावर स्वागतासाठी हजेरी.- 2019 मध्ये विखे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेत सुजय विखे यांना उमेदवारी मिळवून दिली...- राहुल गांधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात अहिल्यानगर जिल्ह्यात आले असताना काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असताना राधाकृष्ण विखे पाटील महायुतीच्या मंचावर...- 2019 पासून आता पर्यंत 13 ते 14 वेळा अमित शाह यांच्या दिल्लीत भेटी...- काही भेटी कौटुंबिक तर काही शेतकऱ्यांच्या कांद्यासह विविध प्रश्नांसाठी भेटी...- 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात प्रश्नावर सुजय व राधाकृष्ण विखे यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती... - 2019 नंतर अमित शाह यांचा दुसऱ्यांदा विखे पाटील यांच्या गावी लोणी मध्ये दौरा..- केंद्रात सहकार खाते निर्माण झाल्यावर देशातील पहिली सहकार परिषद अमित शाह यांच्या उपस्थितीत लोणीत झाली...- त्यानंतर पुन्हा साखर कारखाना व पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी अमित शाह आज लोणी गावाच्या दौऱ्यावर...- एका पक्षात असले तरी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या विखे व कोल्हे यांच्या कार्यक्रमांना आज अमित शाह यांची हजेरी- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादीच्या काळे यांना पाठिंबा देण्यात अमित शाह यांची महत्वाची भूमिका....- स्वर्गीय बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे अशा तिन्ही पिढ्यांशी अमित शाह यांचे जवळचे संबंध....- स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात पंतप्रधान मोदी ऑनलाइन सहभागी होते...