अहमदनगर: आता मोकळाच आहे, मी ठरवलंय की एखादं उद्घाटन असेल, वाढदिवस असेल किंवा जागरण-गोंधळ, हजर राहायचे. दहावा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आगोदर सुजय विखे (Sujay Vikhe Patil) हजर राहील असं वक्तव्य भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलंय. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात राजकारणावर भाष्य केलं आहे. 


बदलेले राजकारण ओळखण्यात मी अयशस्वी ठरलो, मात्र लोकसभेनंतर मी खूप काही शिकलो असे मिश्किल वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी शिर्डी विधानसभेत गाठीभेटीचा धडाका लावला आहे. एका पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत तुफान फटकेबाजी केली. 


राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखेंचा जवळपास 29 हजार मतांनी पराभव केला आहे. 



ही बातमी वाचा: