शिर्डी : दिवाळीच्या (Diwali 2022) सुट्ट्या नुकत्याच संपल्या आहेत. मात्र या सुट्टीमध्ये शिर्डीच्या साई बाबांच्या (Shirdi Sai Baba) झोळीत कोट्यवधींची दान जमा झालं आहे. 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसांत तब्बल 18 कोटी रुपयांचे भरभरुन दान भाविकांनी साईंच्या चरणी अर्पण केलं आहे. यामध्ये रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक, सोनं, चांदी, परकीय चलन यांचा समावेश आहे.


दोन वर्षांनंतर कोरोना (Corona) निर्बंधांशिवाय यंदा सण उत्सव साजरे होत आहेत. त्यामुळे दिवाळी आणि वीकेण्डची सुट्टी असा मेळ साधत भाविकांनी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवाळी सुट्टीच्या पहिल्याच वीकेण्डला भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.  20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसांच्या काळात शिर्डीत भाविकांनी अलोट गर्दी केली होती. साईनामाच्या जयघोषाने शिर्डीनगरी दुमदुमून गेली होती. बाजारपेठही भाविकांनी फुलून गेल्या होत्या.लाखो भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं आणि साईचरणी भरभरुन दान दिलं.


साईंच्या दानपेटीत जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. तर देणगी काऊंटरवरील हा आकडा साडेसात कोटीपेक्षा जास्त आहे. याशिवाय ऑनलाईन देणगीचा आकडाही दीडकोटीच्या जवळ आहे. चेक किंवा डीडीने 3 कोटी, मनीऑर्डरने 7 लाख, डेबिट/क्रेडिट कार्डने 1 कोटी 84 लाख रुपये जमा झाले. 


कोणत्या स्वरुपात किती दान? 



  • दक्षिणा पेटी : 3 कोटी 11 लाख 79 हजार 184  रुपये 

  • देणगी काउंटर : 7 कोटी 54 लाख 45 हजार 408 रुपये...

  • ऑनलाईन देणगी : 1 कोटी 45 लाख 42 हजार 808 रुपये 

  • चेक / डीडी देणगी : ३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये 

  • मनीआर्डरद्वारे : ७ लाख २८ हजार ८३३ रुपये...

  • डेबिट क्रेडिट कार्ड देणगी : १ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये

  • सोने : ८६०.४५० ग्रॅम सोने ( ३९.५३ लाख २९ रुपये )

  • चांदी : १३३४५. ९७० ग्रॅम ( ५. ४५ लाख रुपये )

  • परकीय चलन : २४.८० लाख रुपये ( २९ देशांचे ) 


संबंधित बातम्या 


Shirdi Saibaba : पायी पालख्या शिर्डीत दाखल, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी