अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच सामना पाहायला मिळणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात धक्के दिले आहेत. यानंतर आता नगर जिल्ह्यात शरद पवार मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 


राज्यात महायुती झाल्यानंतर इतर काही मतदारसंघाप्रमाणेच कोपरगावमध्येही तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashotosh Kale) राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) काही दिवसांपूर्वीच आशुतोष काळे यांनी उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांची राजकीय अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 


विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक 


विवेक कोल्हे हे सहकारातील दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आहे. तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात (Nashik Teachers Constituency Election) नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत त्यांनी किशोर दराडे त्यांना तगडे आव्हान दिले होते. आता विवेक कोल्हे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.


शरद पवार नगर जिल्ह्यात भाजपला धक्का देणार?


गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला एकामागे एक धक्के देत आहेत. आता शरद पवार नगर जिल्ह्यात भाजपला धक्का देणार का ? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विवेक कोल्हे हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. 


विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार?


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र येणार आहे.  यावेळी शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांनी काही दिवसापूर्वीच कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केल्याने कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे. यानंतर विवेक कोल्हे लवकरच तुतारी हाती घेणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून कोपरगाव मतदारसंघात रंगली आहे. आता विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा


Sharad Pawar & Ajit Pawar: काल अतुल बेनकेंनी वेगळाच सिग्नल दिला अन् आज बारामतीत शरद पवार-अजितदादांचा एकत्र बॅनर लागला