अहमदनगर कोटयवधींची उलाढाल असलेल्या साईबाबा (Shidi Sai Temple)  संस्थान कर्मचारी सोसायटीच्या‌ निवडणुकीचा बिगुल वाजले आहे.  गेल्या वीस वर्षापासून विखे पाटील गटाची सत्ता असलेल्या सोसायटीत यावेळी परीवर्तन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मागील निवडणुकीत विखे विरोधात तीन उमेदवार विजयी झाले. यावेळी परिवर्तन पॅनल पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार असून थोरात आणि कोल्हे यांची साथ मिळाल्यास निवडणूक (Election) प्रतिष्ठेची होईल यात शंका नाही. 


 1600 हून अधिक सभासद आणि साईबाबा सोसायटीचे 3200 कर्मचारी संख्या असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणूकीचा बिगूल वाजले आहे.. येत्या 11 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील ही एकमेव अशी कर्मचारी सोसायटी आहे जीची वार्षिक उलाढाल जवळपास दिडशे कोटी रूपये आहे तर वार्षिक नफा चार कोटी रुपयांपर्यंत असून 75 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. या कर्माचारी सोसायटीत गेल्या निवडणूकीत विखे विरोधी विठ्ठल पवार यांच्या गटाला 11 पैकी 3 जागा मिळाल्या होत्या.  यावेळी मात्र विठ्ठल पवार यांच्या परीवर्तन विकास मंडळाला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणी भाजपचे विवेक कोल्हे यांचे पाठबळ मिळणार असल्याचं चित्र आहे.


विखेंच्या नेतृत्वात पॅनल


 विखे पाटलांची सत्ता असलेल्या गणेशनगर साखर कारखान्यावर सत्ता मिळवल्यानंतर थोरात आणि कोल्हे गटाने अनेक ग्रामपंचायतमध्ये देखील विखेंना शह दिला होता. आता साईमंदिर कर्मचारी सोसायटीत देखील परीवर्तन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी विश्वस्त व बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय डॉ. एकनाथ गोंडकर यांनी देखील निवडणूक रिंगणात परिवर्तन करण्यासाठीदत्त करणार असलायच जाहीर केले आहे. आतापर्यंत विखे विरुद्ध विखे अशी लढत या सोसायटीमध्ये झाली. विखे समर्थक असलेले राजेंद्र जगताप यांनी याबाबत आपलं मत व्यक्त करताना विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात आम्ही सुद्धा विखेंच्या नेतृत्वात पॅनल उभे करणार असल्याचे स्पष्ट केले.


विखे पाटील विरोधात  थोरात - कोल्हे निवडणूक


साई संस्थान कर्माचारी सोसायटीची खुप मोठी उलाढाल आहे. साई मंदिर परिसरातील प्रसाद , चहा कँटीन , मोबाइल लॉकर या सुविधा सेसायटीच्या मार्फत सशुल्क पुरवल्या जातात तर कर्मचा-यांच्या मुदत ठेवी , कर्ज प्रकरणे या सोसायटीच्या माध्यमातून होतात...या सोसायटीच्या निवडणुकीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणूकीवर प्रभाव टाकणारा असल्याने पुन्हा एकदा विखे पाटील विरोधात  थोरात - कोल्हे या दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार याकडे जिल्ह्याच लक्ष लागले आहे.