अहमदनगर : दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दूध भुकटी (Milk Powder) निर्मिती करणारे आठ कारखाने आहेत. बांगलादेशातील (Bangladesh) राजकीय अस्थिरतेचा परिणाम या दूध भुकटी निर्मिती करणाऱ्या उद्योगांवरही झाल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यापासून जिल्ह्यात 180 कोटी रुपयांची 9 हजार मॅट्रिक टन दूध भुकटी या कारखान्यांत पडूनच आहे. 


भुकटी निर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये एक किलो दूध बुकटी निर्मितीसाठी 240 रुपये खर्च येतो. प्रत्यक्षात मात्र सध्या किलोमागे 205 रुपये भाव मिळत असल्याने दूध भुकटी निर्मिती करणारे उद्योग अडचणीत आले आहेत. भारताच्या तुलनेत न्यूझीलंड या देशातील दूध भुकटी उच्च दर्जाची आणि कमी दराने मिळत असल्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातून या देशातील भुकटीला सर्वाधिक मागणी आहे. 


9 हजार टन दुधाच्या भुकटीची निर्यात थांबली


दुबई, शारदा, कुवेत सौदी अरब यासह बांगलादेश आणि अन्य देशात भारतातून दूध भुकटी, बटर आणि दुधापासून तयार केलेल्या अन्नपदार्थांची निर्यात केली जाते. बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा फटका दूधापासून निर्मित केलेल्या अन्नपदार्थांनाही बसला आहे. राजकीय अस्थिरतेमुळे दीड महिन्यापासून 9 हजार टन दुधाच्या भुकटीची निर्यात थांबली आहे. 


राज्य सरकारने जाहीर केलेला दर मिळावा


दूध निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट दूध भुकटी निर्यात होत नसल्याने त्याची आर्थिक झळ बसणार आहे. बांगलादेशात भारत कांदा, टोमॅटो, डाळिंब मोठ्या प्रमाणात निर्यात होतात त्या उत्पादक देखील या राजकीय अस्थिरतेचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने 32 रुपये जाहीर केलेला दर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला पाहिजे, अशी मागणी शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


राज्यात दुधाचा दर निश्चित! ठरवून दिलेला दर न दिल्यास, अन् भेसळ आढळल्यास थेट गुन्हा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती


मोठी बातमी! रेल्वेकडून 'अहिल्यानगर' नामांतरास ग्रीन सिग्नल; रेल्वेदेखील नवाबाचे नामोनिशाण मिटवणार