Ahmednagar : दुसरी, चौथी, पाचवीपर्यंत शिक्षण झाले असले तरीही थेट दहावी (10th STD) आणि बारावीची गुणपत्रके, एवढंच काय तर पदवीचे बनावट प्रमाणपत्र देण्याच्या गोरखधंद्याचा अहमदनगरच्या (Ahmednagar) तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 50 ते 60 हजारांना या पदवीचे वाटप केल्याचे (Degree Certificate) पोलीस तपासात उघड झालं आहे. या रॅकेटचा धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत (Delhi) असल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागातल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. 


अशोक नामदेव सोनवणे असे अटक केलेल्याचे नाव आहे. 2018 पासून अहमदनगरच्या बालिकाश्राम रोडवर रुद्रा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून याने जवळपास 200 लोकांना दहावी, बारावी आणि पदवी प्रमाणपत्र (Bogus Certificate) दिल्याची माहिती आहे. असाच पद्धतीने अशोक सोनवणे याने नगरच्याच विशाल बाजीराव पारधे यांना बीएस्सी एमएलटीचे बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक केली. पुढे या प्रमाणपत्राच्या व्हेरिफिकेशनमध्ये पारधी यांना हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समजले, त्यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.


विशाल पारधे यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करत असताना अशोक सोनवणेला पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशी सुरू असतानाच सोनवणेच्या मोबाईलवर एका कुरियर सर्व्हिसमधून फोन आला, फोन कुणाचा आहे अशी विचारणा पोलिसांनी केल्यानंतर सोनवणे गडबडला. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी स्वतः ते कुरियर पोलीस ठाण्यात आणले. त्यात दहावी आणि बारावीचे पुणे येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वेगवेगळ्या नावाचे चार गुणपत्रके आढळून आले. हे प्रमाणपत्र बनावट असून हे दिल्ली हून आल्याची कबुली आरोपीने दिली.


दिल्ली कनेक्शन समोर 


दिल्ली येथील सचिन आणि चेतन शर्मा यांनी हे कुरियर पाठविले आहे त्यामुळे शिक्षणाच्या या काळ्या बाजाराचे थेट दिल्ली कनेक्शन समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून संगणक, कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेतली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करत आहेत...मात्र अशी बनावट कागदपत्रे या आरोपींने किती लोकांना दिली आहेत, यातील काही लोक सरकारी नोकरीत आहेत का? काही लोक वैद्यकीय सेवा देत आहेत का?  हे पोलीस तपासात समोर येणार आहेच. 



फोनवरून उलगडा झाला...


संशयित अशोक सोनवणे याची चौकशी सुरू असताना त्याच्या त्याला आलेला फोनवरून या घटनेचा उलगडा झाला. त्यानुसार गुणपत्रके दिले येथील सचिन व चेतन शर्मा यांच्याकडून घेतल्याचे त्यांनी मान्य केले तसेच या गुणपत्रकांसोबत तो अनेक विद्यापीठांच्या बनावट पदव्या पन्नास ते साठ हजार रुपयांमध्ये देत असल्याचे सांगितले. पोलिसांनी अशोक सोनवणे याला ताब्यात घेत त्याच्याकडील 50 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले सोनवणे. आणखी किती? कोणाला अशा पदव्या व बनवून पत्रके दिले आहेत, याची चौकशी पोलीस करत आहेत. 


इतर संबधित बातम्या : 


Pune Fake Certificate : पुण्यात नापास विद्यार्थ्यांना दिली बनावट प्रमाणपत्र,पोलिसांची मोठी कारवाई