राहाता : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या (Ahmednagar Lok Sabha Constituency) निवडणुकीत निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पराभव केल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) शड्डू ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संगमनेर (Sangamner) किंवा राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा सुजय विखेंनी संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची वेध लागले आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जनतेने सुजय विखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दिली होती. यानंतर आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. सुजय विखेंनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले सुजय विखे? 


मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल. इतर मतदारसंघात नको. पक्षाने आदेश दिल्यास संगमनेर मधूनच उमेदवारी करणार आहे. मी संगमनेर मधूनच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघात आता बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे लढत पाहायला मिळणार का? याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. 


सुजय विखेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार


दरम्यान, महायुती सरकारला घरी बसवा, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले होते. याबाबत विचारले असता सुजय विखेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. घरी बसलेल्या माणसाला वाटतं की सगळ्यांनीच घरी बसावं. ते आज विश्रांती घेत आहेत. त्यांना पुन्हा पाच वर्षे विश्रांती देऊ, असे टोला सुजय विखेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Ahmednagar News : विखे-थोरातांची पुढील पिढीही आमनेसामने येणार? विधानसभेच्या तोंडावर नगरमध्ये चर्चांना उधाण


Sujay Vikhe-Patil : नितेश राणे काल म्हणाले मी हिंदूंचा गब्बर, आज सुजय विखे म्हणतात, नगरमध्ये जाती-धर्मावरुन द्वेष पसरवाल तर....