Shivaji Kardile VS Prajakt Tanpure Rahuri Assembly Election 2024 : ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेला अहमदनगर जिल्हा सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे बडे राजकारणी या जिल्ह्यात नेहमीच घडले. नगर जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने आणखी एक मतदार संघ म्हणजे राहुरी विधानसभा. तनपुरे आणि कर्डिले यांच्यामधील संघर्षामुळे राहुरीचे राजकारण चांगलेच तापते होते. ज्यामध्ये शिवाजी कर्डिले यांनी विजयाचा गुलाल उधळला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला.


राहुरी विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. 2019 मध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे 1,09, 234 मतांनी विजयी झाले होते. तर भाजपचे कर्डिले शिवाजी भानुदास यांचा 23,326 मतांनी पराभूत झाले होते. 


2014 ची विधानसभा निवडणूक भाजप विरूद्ध शिवसेनेमध्ये अटीतटीचा सामना झाला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे शिवाजी भानुदास कर्डिले 91,454 मतांनी विजयी झाले होते. शिवसेना पक्षाच्या डॉ. उषाप्रसाद तनपुरे यांचा 25,676 मतांनी पराभव झाला होता. यंदा आता नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार विरूद्ध शरद पवार यांच्यात लढत झाल्यास कोणाचं पारडं जड भरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.