Lemon Price : अहमदनगरच्या बाजार समितीत लिंबाच्या दरात वाढ, 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री 

सध्या लिंबाच्या (Lemon) मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून लिंबाच्या दरांमध्ये (Lemon Price) वाढ झाली आहे.

Continues below advertisement

Lemon Price : सध्या तापमानात (Tempreture) सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी उन्हाचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण तर काही भागात अवकाळी पावसाचा (unseasonal rain) धुमाकूळ सुरु आहे. काही भागात दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे लिंबाच्या (Lemon) मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून लिंबाच्या दरांमध्ये (Lemon Price) वाढ झाली आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Ahmednagar Market committee) लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 60 ते 80 रुपये किलो प्रमाणे लिंबाची विक्री केली जात आहे. याचा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. 

Continues below advertisement

लिंबाची आवक कमी, दरात तेजी 

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच नगरमध्ये लिंबाच्या दरात वाढ सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या लिंबाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. 60 ते 80 रुपये किलो प्रमाणे लिंबाची विक्री केली जात आहे. तर किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी 100 ते 120 रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच खराब हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम लिंबाच्या उत्पादनावर होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्यानेही भाव तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. 

अवकाळी पावसाचा लिंबाला फटका

महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लिंबाचं उत्पादन घेतलं जाते. मात्र, काही वेळाला हवामानातील बदलाचा मोठा फटका लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. सध्या राज्यात काही भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा फटकाही लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या मार्केटमध्ये लिंबू पाठवली जातात. आंध्र प्रदेश सर्वात जास्त लिंबाचे उत्पादन करणारे राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. 

उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत मोठी वाढ 

लिंबू पाण्यात शरीराला आवश्यक असणारी अनेक पौष्टिक तत्व असतात. तसेच यापैकी काही पौष्टिक तत्व वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. यामध्ये पेक्टिन असतं. ज्यामुळे सतत लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. लिंबातील फ्लेवोनॉयड्स शरीरातील मेटाबोलिजम वाढवतात. मेटाबोलिजम वजन कमी करण्यासाठी मदत करतं. दररोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीराची सूजही कमी होते. तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं कामही लिंबू पाणी करतं. लिंबामध्ये पोटॅशियम असतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.

महत्त्वाच्या बातम्या:

Lemon : राज्यात उन्हाचा चटका वाढला, लिंबाच्या मागणीत वाढ; किलोला मिळतोय 80 ते 100 रुपयांचा दर

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola