जगातील ही सर्वात महागडी घड्याळे तुम्हाला माहीतीयेत का?
वेळ अमूल्य असते, पण काही घड्याळं मात्र इतकी अमूल्य असतात की त्यांच्या किमती ऐकून श्वास रोखून धरावा लागतो. ही घड्याळे राजेशाही परंपरा, तांत्रिक पराकाष्ठा आणि अब्जाधीशांच्या संग्रहातील शान दर्शवतात.
Top Expensive Watches
1/7
1. ग्राफ डायमंड्स हॅलुसिनेशन या घड्याळाची किंमत $55 दशलक्ष म्हणजे अंदाजे 456 कोटी एवढी आहे. याचे वजन सुमारे 110 कॅरेट आहे. या घड्याळात 110.09 कॅरेट पिवळ्या हिऱ्यांचा अप्रतिम संग्रह असून 38.14 कॅरेट वजनाचा नाशपतीच्या आकाराचा एक लहान दगड समाविष्ट आहे.
2/7
2. ग्राफ डायमंड्स द फॅसिनेशन या घड्याळाची किंमत 50 दशलक्ष डॅालर्स एवढी असून जगातील दुसरे सर्वात महागडे घड्याळ आहे. हे ज हे घड्याळ 152.96 कॅरेट हिऱ्यांनी जडवलेले ब्रेसलेट घड्याळ आहे. या घड्याळाच्या मध्यभागी 38.14 कॅरेट वजनाचe नाशपतीच्या आकाराचा हिरा असून त्याभोवतीही लहाम हिऱ्यांची आरास आहे.
3/7
3. पाटेक फिलिप ग्रँडमास्टर चाइम या घड्याळात 20 कॉम्प्लिकेशन्स, एक रिव्हर्सिबल केस, दोन स्वतंत्र डायल आणि सहा पेटंटेड नवोन्मेष आहेत. या घड्याळाची किंमत $३१ दशलक्ष म्हणजे सुमारे २६९ कोटी रुपये इतकी आहे. घड्याळाला त्याच्या ड्युअल-डायल डिझाइनमुळे वेगळेपण येते, ज्यामध्ये निळ्या ओपलाइन पार्श्वभूमी, सोनेरी रंगाचे अंक आणि १८ कॅरेट सॉलिड गोल्ड डायल प्लेट्स आहेत.
4/7
4. ब्रेगेट ग्रांडे कॉम्प्लिकेशन मेरी अँटोइनेट या घड्याळाची किंमत $३० दशलक्ष म्हणजे सुमारे 261 कोटी रुपये एवढी आहे. प्रसिद्ध घड्याळ निर्माता अब्राहम ब्रेगेट यांनी डिझाइन केले असून ते पूर्ण होण्यासाठी तब्बल 40 वर्षे लागली. या घड्याळात एक शाश्वत कॅलेंडर, थर्मामीटर आणि इतर प्रगत रचना आहेत. सध्या हे जेरुसलेममधील एलए मेयर संग्रहालयात प्रदर्शनासाठी आहे.
5/7
5. जेगर-लेकौल्ट्रे जोएलेरी 101 मॅन्चेट या घड्याळाची किंमत $26 दशलक्ष म्हणजे सुमारे २२६ कोटी एवढी आहे. हे घड्याळ पांढऱ्या सोन्याने बनवलेले असून घड्याळात टूरबिनल कॅाम्प्लिकेशन बसवले आहे. याचे एक वैशिष्ट्य त्याच्या ठेवण प्रकाराला अनोखे सौंदर्य प्रदान करते कारण ते एकूण 577 हिऱ्यांनी जडलेले आहे. 101 मॅन्चेट
6/7
6. चोपार्ड २०१-कॅरेट घड्याळ या घड्याळाची किंमत $२५ दशलक्ष असून यामध्ये विविध रंग आणि आकाराचे 874 उच्च दर्जाचे हिरे आहेत. या घड्याळातील स्प्रिंग-लोडेड यंत्रणा दाबल्यानंतर तीन हृदयाच्या आकाराचे दगड सूर्याच्या संपर्कात असलेल्या फुलांच्या पाकळ्यांसारखे उघडतात. हे घड्याळ एकूण 201 कॅरेट वजनाचे आहे.
7/7
7.पाटेक फिलिप सुपरकॉम्प्लीकेशन्स या घड्याळाची किंमत $२४ दशलक्ष एवढी आहे. 18 कॅरेट सोन्याने बनलेल्या या घड्याळात एकूण 24 कॅाम्पिकेशन्स आहेत आणि 920 वैयक्तिक भाग आहेत. या घड्याळाच्या डिझाईनसाठी तीन तर निर्मितीसाठी आणखी पाच वर्षे लागली. यामध्ये 2100 वर्षापर्यंतचे अचूक शाश्वत कॅलेंडर आहे.
Published at : 02 Jun 2025 04:59 PM (IST)