अहमदनगर: शिर्डीत (Shirdi) चक्क महसूलमंत्र्यांच्या संस्थेकडून लाच घेताना वजनमापे निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau) विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलंय. अशोक श्रीपती गायकवाड असे या अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अधिकारी महसूलमंत्री विखे पाटील (Vikhe Patil) यांच्या सहकारी संस्थेच्या पेट्रोलपंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅपिंग प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात लाच घेण्याची मागणी केली. हीच लाच घेताना या आरोपीला लाचलुचपत विभागानं अटक केली आहे. घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पेट्रोलपंपाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात दहा हजारांची लाच घेताना श्रीरामपूर येथील वजनमापे निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. अशोक श्रीपती गायकवाड असे या अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून महसूलमंत्री विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या राधाकृष्ण विखे-पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या वतीने प्रवरानगर येथे पेट्रोलपंप चालविण्यात येतो. सदर पेट्रोलपंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅपिंग प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात श्रीरामपूर येथील वजनमापे कार्यालयातील वजनमापे निरीक्षक गायकवाड याने 12 हजार रुपयांची मागणी केली. यासंदर्भात पेट्रोलपंप व्यवस्थापकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तडजोडीअंती त्याने 10 हजार रुपये घेण्याचे मान्य केले.
लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पेट्रोलपंपावर सापळा रचला.त्यात आरोपीला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. काल रात्री उशिरा लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोर अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
लाचखोरीत नाशिक विभाग नंबर 1
ज्याला लागलेली भ्रष्ट्राचाराची (Corruption) कीड संपायचे नाव घेत नाहीये. लाचखोरीला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. 2023 साली महाराष्ट्रात (Maharashtra News) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल 803 गुन्हे नोंदवत 1 हजार 170 आरोपींना ताब्यात घेतले आहे. 803 गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे नाशिक विभागात (Nashik Division) दाखल झाले आहेत. लाचखोरीत नाशिक विभाग नंबर 1 ठरला आहे. नाशिक पाठोपाठ पुणे विभागात 150 गुन्हे दाखल झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 125 गुन्हे दाखल झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ विभागांमध्ये लाचखोरी प्रमाण कमी-अधिक आहे. 2023 या वर्षभरात राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचेच दिसून आले आहे.
हे ही वाचा :