अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते राजेंद्र पिपाडा (Rajendra Pipada) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली होती. यानंतर आता नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या सत्कार सोहळ्यात राजेंद्र पिपाडा यांनी हजेरी लावली. काँग्रेसच्या स्टेजवर राजेंद्र पिपाडा दिसल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपचे (BJP) नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या (Congress) स्टेजवर दिसून आले. शिर्डीतील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र पिपाडा यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र त्यातच आता राजेंद्र पिचड हे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत दिसून आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
राजेंद्र पिपाडा भाजपची साथ सोडणार ?
संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला राजेंद्र पिपाडा यांनी उपस्थिती लावली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात 2009 साली राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक लढवली होती. आता देखील त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र या मागणीनंतर पिपाडा हे थेट विखे पाटलांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांच्या सोबत दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पिपाडा हे महाविकास आघाडीच्या जवळ जात आहे का? येणाऱ्या काळात राजेंद्र पिपाडा नेमका काय निर्णय घेणार? राजेंद्र पिपाडा भाजपची साथ सोडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजेंद्र पिपाडांचा विखे पाटलांवर निशाणा
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ते निवडून येणार नाहीत, असे जनतेचे ठाम मत आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचा दावा भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे. जनतेच्या लोक आग्रहास्तव शिर्डी मतदार संघातून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचे राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या