Dada Bhuse : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अद्यापही कायम आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या जागेची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळणार, असे संकेत मिळत असले तरीदेखील हेमंत गोडसे (Hemant Godse) हे आपल्यालाच उमेदवारी मिळणार यावर ठाम आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा आमचीच आहे. हेमंत गोडसे येथून दोन वेळ जिंकले आहेत, असे म्हणत नाशिकच्या जागेवर दावा केला होता. या पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी देखील नाशिकची जागा आमचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून अजूनही महायुतीत घमासान सुरूच असल्याचे चित्र आहे.
नाशिकची जागा शिवसेनेचीच
दादा भुसे म्हणाले की, नाशिक लोकसभेची स्टँन्डींग जागा ही शिवसेनेची (Shiv Sena) आहे. नैसर्गिक रित्या ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे हा दावा कायम आहे. या क्षणाला देखील आमचा दावा आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली कामे केलीत. महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील , तसे मार्गक्रमण करणे शिवसैनिकांच काम आहे.
महायुतीमध्ये सर्वांचे विचार एक
लोकशाही प्रकियेत काही गोष्टी मागे पुढे होत असतात. काही ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेऊन बदल करावा लागला मात्र बहुतांशी ठिकाणी विद्यमान खासदार आहेतच. महायुतीमध्ये सर्वांचे विचार एक आहेत. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री चर्चा एकत्र करतायत. आरपीआय गट महायुतीचा भाग आहे, एकदिलाने काम करणार आहोत. खा. आठवलेंना वरिष्ठ पातळीवर सन्मान दिला जाईल हा आम्हाला विश्वास असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Chhagan Bhujbal: उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी थकबाकीदार छगन भुजबळांनी उचलले मोठे पाऊल
Nashik Loksabha : लोकसभेचं तिकीट न मिळालेले विजय करंजकर अजूनही वेटिंगवरच, उद्धव ठाकरेंशी भेट नाहीच!