नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी (NCP Sharad Pawar Group Candidate List) जाहीर केली आहे. यात 22 उमेदवारांचा समावेश असून उत्तर महाराष्ट्रातील  येवला, दिंडोरी, सिन्नर, नाशिक पूर्व, बागलाण, अकोले  अहिल्यानगर शहर या सात जागांवर शरद पवार गटाने उमेदवारांची घोषणा केली आहे. 


छगन भुजबळांविरोधात कोण?


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत उमेदवारांची घोषणा केली आहे. येवला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गट कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


राहुल ढिकलेंसमोर गणेश गीतेंचे आव्हान


तर नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार शोधला जात होता. अखेर मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. गणेश गीते यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात राहुल ढिकले विरुद्ध गणेश गीते अशी लढत पाहायला मिळणार असून या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


कोकाटे, झिरवाळ यांच्या विरोधात बड्या नेत्यांना संधी


तर बागलाण विधानसभा मतदारसंघातून दीपिका चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याशी होणार आहे. तर सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात उदय सांगळे यांना तिकीट देण्यात आले आहे. उदय सांगळे यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अकोले विधानसभा मतदारसंघात किरण लहामटे यांच्या विरोधात अमित भांगरे यांना तिकीट देण्यात आले आहे. अहमदनगर शरद मतदारसंघात संग्राम जगताप यांच्या विरोधात अभिषेक कळमकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. 


आणखी वाचा