अहमदनगर : धारधार कोयत्याने वार करत सख्ख्या दिराने दोन भाऊजयींचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात घडली आहे. जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिराने भाऊजयांचा निर्घृण खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना गावातील मुख्य बाजारपेठेच्या चौकापासून काही अंतरावर घडली. घटनास्थळी रक्ताचे मृतदेह अक्षरक्षः रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
दत्तात्रय प्रकाश फापाळे (50 वर्षे) याने सख्खी लहान भावजयी उज्ज्वला अशोक फापाळे (वय 38), चुलत भावजयी वैशाली संदीप फापाळे (वय 40) यांचा सोमवारी दुपारी अडीच वाजता धारदार कोयत्याने हत्या केली. आरोपी दत्तात्रय फापाळे ऊर्फ बापू हा अविवाहित आहे. लहान भाऊ अशोक याचे लग्न झाले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याची पत्नी मृत उज्ज्वला आणि दोन मुले आळंदी येथे मोलमजुरीचे काम करत उदरनिर्वाह करतात. फाफळे कुटुंबाची बदगी गावात शेती आहे. त्या शेतीमध्ये दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पीक घ्यायचे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती. उज्जवला गावाला आल्यापासून दीर दत्तात्रयचे पैशावरून वाद व्हायचे. याच रागातून दत्तात्रय याने आधीच घरात कोयता आणला होता.
घटनेनंतर गावादेखत आरोपी पायी गेला
वैशाली व उज्ज्वला एकाच भावकीतल्या होत्या. उज्ज्वला दोन दिवसांपूर्वी गावी आली होती. वैशाली घटनास्थळाशेजारील दवाखान्यात उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती. उज्ज्वलावर पहिला वार होताच ती सोडवायला गेली आणि तिच्यावरही सपासप तीन वार झाले आणि त्यातच तिचा जीव गेला, दोघींचे देह रक्ताच्या थारोळ्यात पडले. खुनाची घटना झाली त्यावेळी या महिला किंचाळत होत्या. त्यानंतर तो भर गावातून जंगलाच्या वाटेने निघून गेला. घटनेनंतर गावादेखत आरोपी पायी गेला. एकाही व्यक्तीने त्याला अडवले नाही की त्याचा कोणी पाठलाग केला नाही. सध्या पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा :
Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीने जीवन संपवलं; वडिलांनी केला प्रकरणाचा तपास, खिश्यात मिळाली चिठ्ठी अन् कारण आलं समोर