अहमदनगर: विधानसभा निवडणुकीत मविआतील अनेक पराभूत उमेदवारांनी EVM फेरतपासणीची मागणी केली असताना आता भाजपच्या उमेदवारानेही EVM वर शंका उपस्थित केली आहे. कर्जत- जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 17 बूथवरील ईव्हीएमची फेरतपासणीची मागणी केली आहे. यासाठी राम शिंदे यांनी 8 लाख 2 हजार 400 रुपयांचे शुल्क शासनानकडे भरले आहे.
कर्जत जामखेडमधील विधानसभा निवडणूक अटीतटीची झाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी ही निवडणूक अवघ्या 1243 मतांनी जिंकली. हा पराभव मात्र राम शिंदेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच त्यांनी कर्जत-जामखेडमधील 17 बूथवरील ईव्हीएमच्या फेरतपासणीची मागणी केली. त्यासाठी त्यांनी 8,02,400 रुपयेही भरले आहेत.
अजित पवारांवर आरोप
अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये सभा न घेणं हे तिथले महायुतीचे उमेदवार राम शिंदेंच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. मी अजित पवारांना सभा घेण्यासाठी वारंवार विनंती केली, मात्र त्यांनी शेवटपर्यंत सभा घेतली नाही. त्यामुळे रोहित पवारांना फायदा झाला, असा राम शिंदेंच्या वक्तव्याचा मतीतार्थ आहे. एबीपी माझाशी बोलताना शिंदे चांलगेच भावुक झाल्याचं दिसून आलं. .
कर्जत जामखेडमध्ये निकालांनंतर पराभूत झालेले भाजप नेते राम शिंदेंनी, अजित पवारांवर गंभीर आरोप केले. राम शिंदेंनी आपण कौटुंबिक कलहातील कटाचा बळी ठरल्याचा गंभीर आरोप केला. कराडमधील प्रीतिसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी रोहित पवारांनी, अजित पवारांचे आशीर्वाद घेतले आणि हे दृश्य पाहून राम शिंदेंचे डोळे पाणावले. काका-पुतण्या भेटीचा हाच धागा पकडत राम शिंदेंनी, जाणीवपूर्वक अजित पवारांनी माझ्यासाठी कर्जत जामखेडमध्ये सभा न दिल्याचा संशय व्यक्त केला. तसंच राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म न पाळल्याचाही आरोप केला.
रोहित पवार-अजितदादा भेट
अजित पवार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रीतीसंगमावर आमनेसामने आले होते. त्यावेळी काकांचं दर्शन घे असं अजित पवार हे रोहित पवारांना हसत हसत म्हणाले. मग रोहित पवारांनीही दादांविषयीचा आदर आणि त्यांचा मान राखून त्यांना वाकून नमस्कार केला. एवढ्यावरच थांबतील ते अजितदादा कसले? ढाण्या, कर्जत जामखेडमध्ये मी सभा घेतली असती तर काय झालं असतं, असंही अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं.
ही बातमी वाचा: