शिर्डी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघात विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना सोबत घेऊन भाजपला (BJP) फार फायदा झालेला दिसत नाही. 2019 ते 2022 दरम्यान महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना कामाचे सातत्य तुटले होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामे करता आली आहे, अशी भूमिका मांडल्याची माहिती मिळत आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा (NCP Jansanman Yatra) नाशिकपासून (Nashik) सुरु झाली आहे. आज अजित पवारांनी शिर्डीत (Shirdi) साईबाबा मंदिरात (Saibaba Mandir) दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
ठराविक काळात जनसन्मान यात्रा पूर्ण करणार
अजित पवार म्हणाले की, आज जनसन्मान यात्रेचा तिसरा दिवस आहे. जिथे जिथे देवस्थान आहे तिथे जाऊन आशिर्वाद घायचे आणि पुढे जायचे असे नियोजन आहे. सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर ज्या काही योजना दिल्या आहेत. त्याची माहिती देण्याचे काम आम्ही करत आहोत. जनतेचा अतिशय उत्साह पाहायला मिळत आहे. चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. असे वातावरण असले तरी ठराविक काळात जनसन्मान यात्रा पूर्ण करायची आहे. यात तीर्थ क्षेत्रालाही भेटी द्यायच्या आहेत. समाधान, समृद्धी सर्व गोष्टी मिळाव्या हेच साखड साईबाबांना घातले आहे. पण मतदार राजा सरस्व आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही लपवाछपवी करत नाही
संघ बैठकीबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, आपण हे स्वतः ऐकले आहे का? बऱ्याचदा आम्ही बोलत नाही तरी आमच्या तोंडी घातले जात आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही लपवाछपवी करत नाही. असल्या गोष्टी माझ्याकडून होत नाही. गेले 35 वर्ष मी या राजकीय जीवनात काम करत आहे. त्यामुळे अनेक लोक मला ओळखतात, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या