मुंबई राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना (Ajit Pawar)  सोबत घेतलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS)  बैठकीत म्हटलंय. संघ परिवाराच्या समन्वय बैठकीत अजित पवारांना सोबत का घेतलं याची बाजू फडणवीसांनी मांडली.  लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याचा फारसा फायदा भाजपला झाला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचं भाजपचं ठरलं आहे असंही ते म्हटल्याची माहिती समोर येतेय. 


नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  दिवसभर चाललेल्या समन्वय बैठकीत भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस अखेरच्या सत्रात  सहभागी झाली. त्यावेळी या बैठकीत भाजपच्या वतीने संघ परिवारातील 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर विस्तृतपणे भाजपची महाराष्ट्रातील परिस्थिती ठेवल्याची माहिती समोर येत आहे.   लोकसभा निवडणुकीत गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले असा मुद्दाही त्यांनी या बैठकीत मांडलाय. त्यामुळे आगामी काळात भाजप तिकीटवाटपात मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवणार असे संकेतही फडणवीसांनी दिल्याचं मानलं जातंय. विरोधकांच्या नरेटीव्हला प्रत्य़ुत्तर देण्यासाठी आता संघ परिवारानेही सक्रीयपणे मैदानात उतरण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. 


लोकसभा निवडणुकीत शिंदेंची  88% मतं भाजपला ट्रान्सफर : फडणवीस 


 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे झाल्यानंतर कोणत्या परिस्थितीत आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना सोबत घ्यावं लागलं याची राजकीय कारणे फडणवीसांनी सांगितली. फडणवीस म्हणाले, 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं.  तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही एकट्या भाजपच्या मतांची टक्केवारी भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल अशी नव्हती म्हणून आधी एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्यात आलं. तरी दोघांची मताची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नसल्याने अजित पवार यांना सोबत घेण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत भाजपचे मत एकनाथ शिंदे यांना 89% ट्रान्सफर झाले, तर शिंदेंचे वोटही 88% पर्यंत भाजपला ट्रान्सफर झाले आहे..


विधानसभा अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचं भाजपचं ठरलं : देवेंद्र फडणवीस


एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामे करता आली आहे  2019 ते 22 दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना कामाचा जो सातत्य तुटला होता, तो पुन्हा सुरू करता आला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमधील सर्वप्रमुख नेत्यांनी बसून परिस्थितीचा आकलन केले. मात्र त्यातही विधानसभा निवडणुकीत अजित दादा यांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढे जावे असे ठरले, असेही फडणवीस म्हणाले. 


Video : राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं : फडणवीस  



हे ही वाचा :


अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला