अहमदनगर :  लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election)  आता  विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election)  वेध लागलेत. आगामी  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाल्याने अनेक जागांबाबत महायुती आणि मविआत संघर्ष होण्याची शक्यता आहे. अशाच पध्दतीने अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे विद्यमान आमदार असतांनाही महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने या जागेवर दावा ठोकलाय. त्यामुळे या जागेवरून महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

 राज्यात पक्ष फुटीचे राजकीय नाट्य झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले.कोण कोणत्या पक्षात आहे हे लोकांना आणि मतदारांना समजत नाही तीच लोकसभा निवडणूक संपली देखील. मात्र आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र मविआ आणि महायुतीत अनेक जागांवरून संघर्ष होतांना दिसत आहे.अहमदनगर शहर विधानसभा जागेवर महायुतीतील भाजपनेही दावा सांगितला आहे.

महायुतीतील पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील

शहर भाजपाच्या बैठकीत नगर शहर मतदारसंघ भाजपाकडे घ्यावा असा ठराव बैठकीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ या जागेवर दावाच सांगितला नाही तर विद्यमान आमदारांवर टीका देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केलीये. तर आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणीही एखाद्या जागेवर दावा करू शकते. भाजप हा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे त्यांनी तशी भूमिका घेतली असेल मात्र महायुतीतील पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटले आहे.

Continues below advertisement

नगर शहारात भाजपची मोठी ताकद आहे.शिवसेना दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या मागे भाजप होती म्हणून ते 25 वर्ष आमदार राहिले गेल्यावेळी भाजप खासदार यांना शहरातून मोठे लीड मिळाले होते. त्यामुळे भाजपची मोठी ताकद आहे म्हणून नगर शहराची जागा ही भाजपलाच मिळावी असं भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी म्हंटलंय. दरम्यान गेल्यावेळी मला नगरच्या जनतेने भरभरून मताधिक्य दिलं यावेळीही जनता मलाच साथ देईल असा विश्वास विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय. सोबतच आपण निवडणुकीची तयारी केवळ निवडणूक जवळ आल्यावर करत नाही तर 5 वर्ष जनतेत राहून काम करतो असं आमदार जगताप यांनी म्हंटलंय.

अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेवर महायुतीतील दोन पक्षांचा दावा 

 एकीकडे राज्यातील नेते महायुती भक्कम असून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल असं सांगत असताना खाली मात्र महायुतीत फारसं सख्य नसल्याचेच चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशाच पद्धतीने अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेवर महायुतीतील दोन्ही पक्षांनी दावा केलाय.

हे ही वाचा :

Nilesh Lanke : विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला