Ahmednagar News : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एका कुक्कुटपालन कंपनीची 54 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रंगनाथ हरिभाऊ भोर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. नगर तालुका पोलिसांनी नगर तालुक्यातील कामरगाव येथून भोर याला अटक केली आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील दीपक रंगनाथ भोर, सुहास किसन महांडुळे , महेश बबन भोर यांना अटक केली आहे.


प्रकरण नेमकं काय?


दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत. अलिबागच्या प्रिमीयम चीक फिड्स कंपनीची अहमदनगरच्या केडगाव येथे एक शाखा आहे. ही कंपनी पोल्ट्री चालकांशी करार करुन त्यांना बॉयलर कोंबड्यांची पिल्ले, खाद्य आणि औषधे देते. शेतकरी ती पिल्ले वाढवतात. त्या मोबदल्यात त्यांना पिल्लांच्या वजनावरन पैसे दिले जातात. या व्यवसायाबाबत पोल्ट्री चालकांशी करार केले जातात. दरम्यान, केडगाव शाखेकडून संबंधित शेतकर्‍यास दिलेले पक्षी व खाद्य शेतकर्‍यांनी परस्पर विकल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला होते. पक्षी आणि खाद्य शेतकऱ्यांनी परस्पर विकलेले असल्याचे केडगाव येथील शाखा व्यवस्थापक शिवाजी विश्वनाथ गायकवाड यांनी कंपनीचे मालक शाम भालचंद्र ढवण यांना सांगितले होते. त्यानंतर शाम ढवण यांनी लेखापरीक्षक संदेश हिराचंद दांडेकर (मेढेखार, ता. अलिबाग, जि. रायगड) यांना शाखेचे लेखा परीक्षण करण्यास व कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यास सांगितले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.


दरम्यान, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चौघांना आतापर्यंत अटक झाली आहे. उपनिरीक्षक चव्हाण यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इथापे, भालसिंग यांनी ही कारवाई केली आहे.


महत्वाच्या बातम्या: