अहमदनगरशासन आपल्या दारी(shasan apalya dari) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मी पुन्हा येईन घोषणेवर भाष्य केलं. 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही, असं फडणवीस म्हणाले. तसंच, आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार आहे, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला  आहे. ते शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. शिर्डीजवळच्या काकडी गावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी सुरू आहे.  मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल,अजून देखल त्याची दहशत आहे. 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र  ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो. 


हो आहे आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, पण...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला आहे. दोघांची नजर  उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर अशी टीका केली जाते. यावर फडणवीस म्हणाले, आमची नजर खुर्चीवर आहे मात्र ती  खुर्चीच्या संरक्षणासाठी आहे. कोणी आमच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेने कोणी पाहू नये, यासाठी आमचे लक्ष मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे आहे. 


दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही


विकासकामांना पैसा कमी पडणार नाही. मराठवाडा, नगर या भागातील पाण्याचा वाद कायमस्वरूपी संपवायचा आहे. वाहून जाणार पाणी इकडे वळविण्यासाठी लवकरच काम सुरू करतोय. आपल्या शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम करतोय. नमो शेतकरी सन्मान  योजना, एक रुपयात पीक विमा योजना अनेक योजना आणल्या आहे. दुर्दैवाने दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी असणार आहे, असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिले.   


नगर जिल्हा पहिला सौर ऊर्जा असलेला जिल्हा करण्याचे प्रयत्न


 आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत असते. सतत लाईट जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होते. मात्र नगर जिल्हा या त्रासापासून मुक्त होणार आहे. नगर जिल्हा कदाचित पहिला सौर ऊर्जा असलेला जिल्हा होईल या पद्धतीने वेगाने काम सुरु होणार आहे आणि निश्चित वेळेत पूर्ण होणार  असे फडणवीस म्हणाले.  


हे ही वाचा :


 नवाब मलिक कोणता झेंडा हाती घेऊ स्थितीत; अजित पवार गटाने भेट घेताच जयंत पाटील काय म्हणाले?