अहमदनगर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Election) निकाल हळूहळू जाहीर होत आहे. अशातच संगमनेर (sangamner) तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर विखे पाटील (Vikhe Patil) गटाने सत्ता काबीज केली आहे. विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा विजय झाला आहे. कर्जत - जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. कुंभेफळ आणि खेडगावात भाजपचा सरपंच विराजमान झाला आहे. तर केवळ एका जागेवर करमणवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा विजय झाला आहे. तर उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. 


अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी 16 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर 178 ग्रामपंचायतसाठी आज प्रत्यक्षात मतदान झालं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात 120 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Grampanchayat) झाली असून, 12 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 108 ग्रामपंचायतसाठी मतमोजणीला सुरवात झाली आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात 74 ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली असून, यातील 6 ग्रामपंचायतचा सरपंच पदाची बिनविरोध निवड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख यासह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. 


दरम्यान उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यातील 06 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, खानापुर, पेंढेवाडी, कौठवाडी, आंबेगवण, देवगाव, कोकणवाडी आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर या सर्व ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे संगमनेर  दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, यात बोरबन ग्रामपंचायत काँग्रेसकडे, तर ढोलेवाडी गुंजाळवाडी ग्रामपंचायत देखील काँग्रेसकडे गेली आहे. श्रीरामपुर तालुक्यातील 04 ग्रामपंचायती बिनविरोध असून, यात भैरवनाथ नगरकडे BRS कडे, गुजरवाडी काँग्रेसकडे, जाफराबाद, रामपुर स्थानिक आघाडीकडे, राहुरी तालुक्यातील 01 प्रिंप्री वळण ग्रामपंचायतवर देखील स्थानिक आघाडीचे वर्चस्व आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा, प्रिंप्री निर्मळ, वाकडी, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रूक या ग्रामपंचायतीमध्ये मविआ आणि भाजपमध्ये मोठी चुरस आहे. 


अशा आहेत लढती 


अहमदनगर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतीपैकी 16 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यात, उत्तर नगर जिल्ह्यात 10 तर दक्षिण नगर जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतचा समावेश आहे. म्हणजेच 194 पैकी 178 ग्रामपंचायतसाठी मतदान झालं असून, त्यात उत्तरेकडे 110 तर दक्षिणे 68 ग्रामपंचायतसाठी आज मतमोजणी होत आहे. दरम्यान कर्जत-जामखेडमध्ये भाजप आमदार शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी रोहित पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर शेवगाव- पाथर्डी मध्ये भाजप आमदार मोनिका राजळे विरुद्ध चंद्रशेखर घुले गटाची प्रतिष्ठा पणाला लागावी आहे. तिकडे उत्तरेकडे मंत्री राधाकृष्ण विखे विरुद्ध माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इतर ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये लढत होणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर 1, महायुतीला मतदारांचा कौल; जाणून घ्या सकाळी 11 पर्यंत कोणाच्या पदरात किती यश?