अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) चौंडी येथील यशवंत सेनेच्या उपोषणाचा 18 वा दिवस आहे. धनगर आरक्षण (Dhangar Reservation) अंमलबजावणीच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. दरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेणारे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांनी उपचार सोडून देत चौंडी (Chaundi) गाठली असून आता ते चौंडीतच उपोषण करणार आहे. त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी देखील उपोषणस्थळी जाऊन उपोषण कर्त्यांशी चर्चा केली आहे. 


गेल्या सतरा दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या (Yashwant Sena) वतीने आंदोलन सुरु आहे. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु असून हळूहळू आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलन स्थळी भेट दिली असून उपोषणकर्ते सुरेश बंडगर (Suresh Bandgar) यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. तर उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावत असून दुसरे उपोषणकर्ते  अण्णासाहेब रुपनवर यांच्यावर मुंबईच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आता ते उपचार सोडून चौंडी येथील उपोषणस्थळी पोहचले आहेत. आत याच ठिकाणी पुन्हा उपोषणाला सुरवात करणार आहे. 


दरम्यान या सर्व घडामोडीत धनगर आरक्षणासाठी (Dhangar Aarakshan) अनेक वर्षांपासून मागणी लावून धरणारे गोपीचंद पडळकर हे देखील उपोषणस्थळी भेट देऊन आलेले आहेत. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जात आहे. त्यानुसार आता गावागावात जाऊन आंदोलन करण्यात येणार आहे. यशवंत सेनेच्या माध्यमातून काल पत्रकार परिषद घेण्यात आली, यात राज्यभरात उद्या आणि परवा असे दोन दिवस लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे धनगर आरक्षण गावागावात पोहचणार असल्याचे दिसते आहे. तर दुसरीकडे मुंबईतील (mumbai) सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या बैठकीमध्ये सरकारमधील मंत्री आणि काही आमदारांनी देखील हजेरी लावली होती. तर यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाला यशवंत सेनेच्या आंदोलकांनी विरोध केला. सरकारची ही भूमिका धनगर समाजाला मान्य नसून तात्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. 


आता गावागावात लाक्षणिक उपोषण 


दरम्यान धनगर आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस आक्रमक होत चालला असून उपोषण सुरेश बंडगर यांची प्रकृतीही खालावत असल्याची माहिती आहे. दुसरे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर हे देखील मुंबईतील उपचार सोडून चौंडी येथील उपोषणस्थळी हजर झाले आहेत. आता ते येथूनच आंदोलन सुरु करणार आहेत. त्याशिवाय यशवंत सेनेच्या बैठकीतून ' आता धनगर समाज बांधवानी गावागावांत उपोषण सुरू करावे, असे आवाहन यशवंत सेनेकडून करण्यात आले आहे. त्यानुसार उद्या आणि परवा एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी वैद्यकीय उपचार नाकारले असून उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. 'मी उपोषणाला निघतानाच माझ्या बायकोचे कुंकू पुसून आलो आहे, बायकोला सांगितले आहे की, माघारी आलो तर तुझा नाही आलो तर धनगर समाजाचा' असं म्हणून मी बाहेर पडलो आहे. त्यामुळे धनगर आरक्षण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील असे वक्तव्य सुरेश बंडगर यांनी  केलाय.


इतर महत्वाची बातमी : 


Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर सरकारने घेतलेल्या निर्णयाची चौंडीत होळी, आंदोलन सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम