अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात 'महाराष्ट्राची लोकधारा लावणी' चा कार्यक्रम होणार असल्याचे बॅनर समाज माध्यमात व्हायरल होत आहे. हाच बॅनर पोस्ट करत भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare) यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे आमदार राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे युवा नेतृत्व रोहित पवार यांचा आज वाढदिवस असून या निमित्ताने मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर कर्जत (Karjat) शहरातील दादा पाटील महाविद्यालयातील (Dada Patil Collage) शारदाबाई पवार सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राची लोकधारा लावणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावरूनच नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमावरून भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आक्षेप घेत फेसबुक पोस्टद्वारे निषेध नोंदवला. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेणे हे कॉलेज प्रशासनाला पटतय का? सरकार काय कारवाई करणार असा सवाल पोटरे यांनी फेसबुक पोस्ट माध्यमातून केला आहे.
काय म्हटलंय फेसबुक पोस्टमध्ये?
अहमदनगर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ज्या पोस्टमध्ये 'रयतच्या जनरल बॉडी सदस्य असलेल्या आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या राजकारणाचा अड्डा केलेल्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मागच्या आठवड्यात 'जय श्रीराम' च्या घोषणा दिल्यामुळे कॉलेज प्रशासनाने या सर्वांना दिवसभर अमानुषपणे डांबून ठेवून नापास करण्याची धमकी दिली. मात्र तिथेच आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेणे हे कॉलेज प्रशासनाला पटतंय का? सरकार काय कारवाई करणार? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या शिक्षण संस्थेत चाललेला राजकिय हस्तक्षेप बंद करणार का? हे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना पडलेले प्रश्न आहेत. जय श्री राम नाही तर लावणी पण नाही.
Happy birthday आमदार साहेब..अशी पोस्ट केली आहे...या पोस्टमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली असून यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
नेमका काय कार्यक्रम ?
आज आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत येथील आमदार रोहित दादा पवार मित्र मंडळाने महाराष्ट्राची लोकधारा लावणी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यात उत्पाद लावणी मंडळ पंढरपूर यांच्यासह नंदा-उमा इस्लामपूरकर भगिनी यांचा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकधारा, लोक रंग, लावणीचा प्रवास, ढोलकी व लावणीच्या प्रात्यक्षिकांसह सादरीकरणाचे नियोजन केलेले आहे. अस्सल मराठमोळ्या लोककलेचा देवघरापासून ते फडापर्यंतचा वाटचालीचा उलगडा करून देणारा हा कार्यक्रम असल्याचं या पोस्टरवर म्हटला आहे. हा कार्यक्रम उद्या तीन ते सहा या वेळेत हा कार्यक्रम होणार असून कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि आता याच कार्यक्रमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी :
ही आहे फेसबुक पोस्ट :