अहमदनगर : नवनागापूर (Navnagapur) येथे अल्पवयीन मुलांना अर्धनग्न करून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शहरातील सारसनगर (Sarasnagar) भागामध्ये चोर असल्याच्या संशयावरून एका परप्रांतीय युवकाला मारहाण (Beating) झाल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे अहमदनगर एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारसनगर येथील औसरकर मळ्यात एका परप्रांतीय व्यक्तीला चोर असल्याच्या संशयावरून झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि एकच खळबळ उडाली.
चौघांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी
राजू हिरा घोष (Raju Hira Ghosh) असं मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये (Bhingar Police Station) पाच जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण औसरकर, बाबासाहेब पुंड, विशाल इवळे, ऋषिकेश जायभाय, ऋतिक पुंड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील चौघांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. घोष हा चोर असल्याच्या संशयावरून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. सध्या घोष याच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.
व्हिडीओ व्हायरल होताच झाला भांडाफोड
चोरीच्या संशयावरून राजू घोष याला झाडाला बांधून व लटकावून अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले. त्यानंतर घोष याला सोडून देण्यात आले. काही वेळातच व्हिडीओ चित्रिकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता आपण अडचणीत येणार असा संशय मारहाण करणार्यांना आल्याने त्यांनी घोष याचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे त्या मारहाण करणार्यांनी पोलिसांना सांगितले. परंतु त्याला झालेली गंभीर मारहाण व व्हिडीओ चित्रिकरण यावरून पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करून चौघांना तात्काळ अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त