CM Eknath Shinde : सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज अहमदनगर (Ahmednagar) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्री आज पाहणी करणार आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.


धारुर आणि वाडीबामणी गावात मुख्यमंत्री करणार पाहणी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी 10 वाजता पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी करतील. मुख्यमंत्री दुपारी दोन वाजता धाराशीव जिल्ह्यातील धारुर आणि दुपारी तीन वाजता वाडीबामणी या गावात नुकसानाची पाहणी करणार आहेत. दरम्यान, काल (10 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. काल त्यांनी बागलाण (Baglan) तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain), वादळी वारा आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.


फळबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान 


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना दिल्या आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. यामध्ये द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.


मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची मदत वितरीत


चार ते आठ मार्च आणि 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनाकडून मदत वितरीत करण्यात आली आहे. मार्चमधील नुकसानीसाठी सरकारने 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी वितरीत केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


CM Eknath Shinde at Nashik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाचा दौरा