Shirdi Airport : मुंबई, पुणे, नागपूरनंतर (Nagpur) राज्यातील सर्वात गजबजलेले शिर्डी येथील साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवरून (Shirdi Airport) शनिवार रात्री नाईट लाँडिंग व टेकऑफला (Night Landing) सुरुवात झाली. दिल्लीहून 232 प्रवाशांना घेऊन आलेल्या इंडिगो एअरवेजच्या (Indigo Airleg) गोइंग विमानाने पंधरा मिनिटे आधीच रात्री आठ वाजता शिर्डी विमानतळावर यशस्वी लँडिंग केले. तर ते नऊ वाजता याच विमानाने 232 प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे  (Delhi) टेकऑफ केले. 


लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत (Shirdi) रोजच हजारो साईभक्त (Saibaba) दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर शिर्डीत आता साईभक्तांसाठी नाईट लँडिंगचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिर्डीत यशस्वी लँडिंग होताच प्रवाशांनी साईनामाचा जयघोष केला. नाईट लँडिंग टेकऑफमुळे शिर्डीसाठी दिवसाप्रमाणे देशांतर्गत रात्रीच्याही विमानांची उड्डाणे वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शिर्डीसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यांमधील पर्यटन कृषी आणि औद्योगीकरणाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर इतर राज्यातून येणाऱ्या साईभक्तांसाठी महत्वाची सुविधा असणार आहे. वेळीच शिर्डीत पोहचून दर्शन घेऊन पुन्हा वेळेत माघारी परतण्याची सोया देखील झाली आहे. 


दरम्यान ऑक्टोंबर 2017 मध्ये साईबाबा समाधी शताब्दीच्या प्रारंभाला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमान शिर्डी विमानसेवेचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच विमानसेवेला प्रवाशांनी पसंती दर्शवली होती. दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, तिरुपती, इंदूर, विजयवाडा, विशाखापट्टणम आदी भागातून शिर्डी येणाऱ्या भाविकांनी विमानसेवेला मोठा प्रतिसाद दिला. शिर्डीत नाईटलाइंडिंग सुरू करण्याबाबत 2018 मध्ये घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर चार वर्षांनी हे लँडिंग सुरू झाले आहे. नाईट लँडिंग नंतर शिर्डीतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्मिनलसाठी राज्य सरकारने नुकतीच 527 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिर्डीत कार्गो सेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील कृषी तसेच औद्योगीकरणास चालना मिळू शकेल, अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे. 


हजयात्रेकरूंसाठी विमानसेवा देण्याचा विचार 


दरम्यान नाईट लँडिंगला सुरुवात झाल्यापासून विमानसेवा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजयात्रेकरूंसाठी देखील शिर्डीतून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. सिंगापूर, दुबई येथूनही काही विमान कंपन्या शिर्डीसाठी सेवा सुरू करण्यास उत्सुक असल्याची असल्याचे समजते आहे.  सद्यस्थितीत शिर्डीतून विमानांचे यशस्वी लर्निंग होत आहे. हैदराबादहुन २, दिल्लीतून चार, तिरुपती दोन, इंदूर दोन, विशाखापट्टणम दोन, बंगळुरू चार, चेन्नई चार अशा फ्लाईट सध्या उपलब्ध आहेत. नाईट लँडिंग साठी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा केला आताही सेवा सुरू झाल्याने शिर्डीकरांसाठीच नव्हे तर नगर जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीनेही आनंदाची बाब असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.